Breaking News

Monthly Archives: June 2020

पनवेल मनपातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन द्यावे

नगरसेवक अनिल भगत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात भगत यांनी निवेदनही दिले …

Read More »

पावसाअभावी रोपे सुकू लागली

कर्जत : बातमीदार गेल्या 15 दिवसांपासून वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे भाताची रोपे सुकू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही, तर बळीराजावर भाताची रोपे पुन्हा रुजविण्याची वेळ येणार आहे.  कर्जत हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखळा जातो. तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांनी …

Read More »

रायगडात कोरोनाचा हाहा:कार; तब्बल 160 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या तब्बल 160 रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 25) झाली, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात पहिल्यांदाच एवढे रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 82, पनवेल ग्रामीणमधील 36, अलिबाग तालुक्यातील नऊ, खालापूर तालुक्यातील आठ, उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण तालुक्यातील चार, …

Read More »

रायगडात भीषण पाणीटंचाई

315 गावे-वाड्यांना टँकर्सद्वारे जलपुरवठा  अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण बनले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त 315 गावे आणि वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स तसेच अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.उरण तालुक्यातील पाच वाड्यांमध्ये दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील एक गाव व एक वाडीची तहान एका खासगी टँकरद्वारे …

Read More »

यंदा दहीहंडीला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधीजून महिना सरत आला की मुंबई आणि उपनगरांमध्ये ‘बजरंग बली की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’ अशा आरोळ्या ठोकत मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला सुरुवात होते, मात्र यंदा कोरोनाच्या साथीमुळे परिस्थिती अगदी वेगळी आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समन्वय …

Read More »

सायबर युद्धाचे ढग

कोरोनासंबंधी आर्थिक मदत, मोफत कोविड चाचणी या आशयाचे मेल सरकारी ई-मेलवरून आल्याचे भासवून सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचा हॅकर्सचा प्रयत्न असू शकेल. हे हॅकर्स बड्या कंपन्या, श्रीमंत व्यक्ती यांच्यावर तर हल्ले करतातच, परंतु एखाद्या मोठ्या हल्ल्यात लाखो सर्वसामान्यांनाही फटका बसू शकतो. गेले अनेक दिवस भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमाभागात तणाव आहे. चीनची …

Read More »

पेणमध्ये कडकडीत बंद; नगराध्यक्षांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी व्यापारीवर्ग, दुकानदार व नागरिकांना चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेणकरांनी गुरुवारी (दि. 25) पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळला. पेणमध्ये मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पेण शहरात जनता …

Read More »

श्रमदानातून शाळा उभारणी

माणगाव : प्रतिनिधी निसर्ग वादळाने 87 पेक्षा अधिक गावांना या वादळाचा फटका बसला. घरे, बागा, इमारती व सार्वजनिक इमारतींचे या वादळाने मोठे नुकसान केले आहे. ताशी 120 किमी वेगाने समुद्र किनार्‍यावरून जिल्हयातील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, अलिबाग, सुधागड, महाड, पोलादपूरसह उर्वरित तालुक्यात घुसलेल्या वादळाने घरे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान …

Read More »

‘कोरोनाग्रस्तांसाठी पनवेलमधील मोठ्या हॉटेल्समध्ये बेड्स तयार करा’

पनवेल : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वाढत्या कोरोना रुग्णांकरीता पनवेलमधील मोठी हॉटेल्स ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विविध रुग्णालयीन उपकरणे लावण्यात यावे. तसेच तेथे बेड्सचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रामध्येही कोरोना रुग्णांची संख्या …

Read More »

मुंबईतील रुग्णालयाबाहेरचे एक हजार मृत्यू का लपवले? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले एक हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचे एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले एक हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा …

Read More »