केमिकल गळतीने घबराट महाड ः प्रतिनिधी जेएनपीटीवरून महाड औद्योगिक वसाहतीमधील आक्वाफार्म कारखान्यामध्ये एचईडीपी रसायन घेऊन जाणारा कंटेनर गुरुवारी (दि. 25) सकाळी दासगाव हद्दीत पलटी झाला. कंटेनरमधील ड्रम फुटल्याने रसायन गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कंटेनर रस्त्याच्या कडेला तीन दुकानांवर पलटी झाल्यामुळे या दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …
Read More »Monthly Archives: June 2020
मानव अधिकारी संघटनेतर्फे मास्कवाटप
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मानव अधिकारी संघटना मुरूड यांनी आतापर्यंत सुमारे 3000पेक्षा जास्त मास्क वाटपाचा निर्धार आणि मनाशी खूणगाठ बांधून पावले उचलली आहेत. यामध्ये मुरूड परिसरातील विविध सार्वजनिक कामकाजाची दुकाने, कार्यालये, भाजीमार्केट, घरोघरी व विविध ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले. गुरुवारी भोगेश्वर पाखाडी येथे मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय …
Read More »माणगाव तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
माणगाव ः प्रतिनिधी रायगडात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. आता सरकारी कार्यालयांकडे कोरोनाने आपला मोर्चा वळविला. रायगड जिल्हा परिषदेपाठोपाठ तालुक्यातील तहसील कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वार्डबॉय यांच्यानंतर आता तहसील कार्यालय माणगावमधील एका शिपायाचा तसेच खांदाड माणगावमधील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील हेदमलई येथील …
Read More »मौजे पोयनाड परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे पोयनाड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. परिणामी मौजे पोयनाड येथील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलले घर व त्यालगतची 12 घरे तसेच त्यांचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून …
Read More »वातप्रकोप टाळण्यासाठी…
आरोग्य प्रहर पावसाळ्यात शरीरातील वाताचा त्रास वाढतो. सांधेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. ज्यांना मुळातच सांधे दुखण्याचा त्रास आहे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण निरोगी व्यक्तींनाही त्रास होण्याची शक्यता असते. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेणारा, चलन करणारा तो वात अशी वाताची साधी व्याख्या करता येईल. पृथ्वीवरील वातामुळे (म्हणजे वार्यांमुळे) …
Read More »वादळग्रस्त बागायतदारांना तुटपुंजी मदत
जास्तीत जास्त भरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागामध्ये असलेल्या नारळ व सुपारीच्या बागायतदारांना बसलेला आहे. येथील अनेकांचा उदरनिर्वाह बागायतीतून येणार्या उत्पन्नावर चालतो. राज्य शासनाकडून हेक्टरी 50 हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे, परंतु ही नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचे …
Read More »झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या!
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तआपले नेते दि. बा. पाटीलसाहेब योद्धा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त जनतेचा विचार केला. शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढणारे झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या, असे आवाहन दिवंगत …
Read More »रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम अलिबाग : प्रतिनिधीडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी (दि. 23) अलिबागमधील कुरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 250 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही गरज जाणून रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी …
Read More »कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना पैसे परत कधी मिळणार?
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा प्रशासकाला सवाल पनवेल : रामप्रहर वृत्तकोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी बुधवारी (दि. 24) कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने प्रत्यक्ष बँकेत जाऊन आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती घेतली. या वेळी त्यांनी बँक प्रशासक श्री. मावळे यांना …
Read More »रायगडात कोरोनाचा उच्चांक; तब्बल 142 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 24) तब्बल 142 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 95, पनवेल ग्रामीणमधील 27, उरण तालुक्यातील 10, खालापूर तालुक्यातील चार, रोहा तालुक्यातील तीन, तर कर्जत, पेण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper