Breaking News

Monthly Archives: June 2020

उत्पादन शुल्क विभागाकडून गरजूंना मदत

पनवेल ः बातमीदार पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी तळा येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. घरांचे छप्पर उडल्याने नागरिकांना घरविना राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित …

Read More »

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा सज्ज

नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकर्‍यांचा शेतमाल बांधावरच नाश पावतोय. त्याला उठाव नाही. अशा परिस्थितीत शेतकरी उभा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नवी मुंबईतील यूथ कौन्सिल नेरूळच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मदतीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांच्या शेतमालास वाजवी भाव मिळावा आणि नागरिकांनाही योग्य दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध …

Read More »

कोरोनाबाधितांचा अधिवास विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यातील विचुंबे, उसर्ली खुर्द, मौजे वावंजे, सुकापूर आणि उलवे येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.  विचुंबे, येथील कोरोना रुग्ण राहत असलेली ओमकार पार्क-1 बिल्डिंग, उसर्ली खुर्द येथील निळकंठ फेज-1 बिल्डिंग, ओ विंग …

Read More »

वाइन शॉपवाल्यांचा झोल; चढ्या भावाने मद्यविक्री; शासनाच्या आदेशाला बगल

पनवेल ः वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद केली होती. परिणामी शासकीय महसुलात प्रचंड तूट होत असल्याने अखेर शासनाने कर प्राप्तीसाठी महसूल मिळणारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात मद्यविक्री ऑनलाइन किंवा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजद्वारे घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली, …

Read More »

नेरळ पोलिसांनी पकडलेल्या गुरेचोर टोळीतील तिघांवर 13 गुन्हे दाखल

कर्जत : बातमीदार – बदलापूर येथून बॅरिकेट तोडून आलेले गुरे चोरणार्‍यांच वाहन नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्या गाडीतून प्रवास करणार्‍यांना पकडले होते. या गाडीतील तीन जण अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांना चकवा देणारी ही टोळी …

Read More »

रोह्यात शासकीय इमारतींची पडझड; पंचनामे सुरू

रोहे : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने रोहे तालुक्यात थैमान घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरावरील छपरे, अनेक बागायतदारांची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळाचा तालुक्यातील सरकारी इमारतीनाही फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने यांच्यासह अन्य इमारतींचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे चालू …

Read More »

रायगडात वादळानंतर भयाण स्थिती

पेण दवणसर येथे गोशाळेचे नुकसान दोन गायी दगावल्या, एक बेपत्ता पेण : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने पेण तालुक्यात थैमान घातल्यानंतर या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचा सामना करणार्‍या जनतेला वादळी पावसाने हतबल केले आहे. या वादळात दवणसर येथील जगन्नाथ ठाकूर यांच्या श्री समर्थ कृपा गोशाळेचे लाखो रुपयांचे …

Read More »

रायगड जिल्ह्यात 45 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 45 नवीन रुग्णांची सोमवारी (दि. 8) नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 36, पनवेल ग्रामीणमध्ये तीन, महाडमध्ये दोन आणि उरण, खालापूर, अलिबाग व माणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तर पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला …

Read More »

विरोधी पक्षनेते दरेकर आज श्रीवर्धनच्या दौर्‍यावर

महाड : प्रतिनिधीविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी (दि. 9) श्रीवर्धनच्या दौर्‍यावर येत आहेत. निर्सग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून, श्रीवर्धन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असल्याने या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी दरेकर येत आहेत. या दौर्‍यात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी हेही असणार …

Read More »

पनवेल, श्रीवर्धनमध्ये भाजपतर्फे विशेष सहकार्य

स्वच्छता मोहिमेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळचाही सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात चक्रीवादळ आणि अनलॉकमुळे वाढलेला कचरा आणि पालापाचोळा हटवून शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला मदत व्हावी, याकरिता भारतीय जनता पक्ष आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. …

Read More »