अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने वीज यंत्रणा कोलमडली आहे. आजही अनेक गाव अंधारात आहेत. रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडचा दौरा करून वीज पुरवठा सुरु करण्या संधर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे कार्यकारी अभियंता तपासे यांच्याबरोबर रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली व कामांचा …
Read More »Monthly Archives: June 2020
पेणमध्ये कोरोनाचे आठ नवे रुग्ण
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोनाचे आणखीन आठ रुग्ण आढळले आहेत. पेण शहरातील फणसडोंगरी येथे चार व पूर्व विभागातील मांगरुळ येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा आता पेण तालुक्यातील पूर्व विभागासह पेण शहरातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले त्याचा …
Read More »रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू
पेण ः प्रतिनिधी पेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने …
Read More »निसर्ग भ्रमंती मंडळाकडून वृक्षारोपण
कर्जत ः बातमीदार कर्जतच्या कचेरी टेकडीवर ओम निसर्ग भ्रमंती मंडळाच्या माध्यमातून हिरवाई निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळात ज्या भागात झाडे कोसळली, त्या जिल्हा परिषद विश्रामगृह परिसरात 50 मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली. कर्जतच्या तहसील टेकडीवर ओम निसर्ग मैत्री भ्रमंती परिवाराच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेकडीवरील उप …
Read More »शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या; आमदार निरंजन डावखरे यांची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना मोठा फटका बसला असून इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खासगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. …
Read More »नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले
नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही. वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर …
Read More »गुंडगे परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत; महावितरणचे प्रयत्न
कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कर्जत शहरातील गुंडगे प्रभागात ठाकूरवाड़ी येथील एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडले होते. त्यामुळे गुंडगे भागातील तो परिसर आणि विश्वनगर चार दिवस अंधारात होते. दरम्यान, महावितरणकडून सातत्यपूर्ण प्रयत्न झाल्याने त्या परिसरात चार दिवसांनी विजेचे दिवे पुन्हा उजळले आहेत. गुंडगे भागातील विश्वनगर व ठाकूरवाडी परिसरात …
Read More »चक्रीवादळाचा हाहाकार; रोह्यात फळबागांचे मोठे नुकसान; हजारो हेक्टर क्षेत्र बाधित
रोहे ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात थैमान घालून हजारो घरांचे अतोनात नुकसान केले. अनेकांच्या घरावरील पत्रे व कौले उडाली. विजेचे खांब पडले. रोहा तालुक्यात असंख्य झाडे उन्मळून पडली. बागायतदार शेतकर्यांचे सर्वांत जास्त नुकसान झाले असून सर्वाधिक फटका आंबा, केळी, पपईसारख्या फळझाडांना बसला आहे. रोहा तालुक्यात सुमारे 1400पेक्षा जास्त हेक्टरमधील …
Read More »नवी मुंबईत 88 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 8) कोरोनाचे 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 92 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …
Read More »चिखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे विनायक पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त – चिखले ग्रामपंचायतमध्ये सोमवारी (दि. 8) झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना या वेळी पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रविंद्र शेळके, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper