Breaking News

Monthly Archives: June 2020

निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे पनवेलमधील जनजीवन विस्कळीत

पनवेल ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने पनवेल तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. नागरिकांच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागांत वीजही नव्हती. त्यामुळे पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 4) पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. शुक्रवारीही पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले …

Read More »

पनवेल मनपाचा स्वच्छतेसाठी पुढाकार

नागरिकांची होणार दुर्गंधीपासून मुक्तता पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर आणि मनुष्यबळ वाढणार असल्याने पनवेलकरांची आता दुर्गंधीपासून मुक्तता होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 4) प्रवीण पाटील …

Read More »

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावता राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, …

Read More »

कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच

मुंबई ः प्रतिनिधीसध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाविरोधात दिवसरात्र लढा देत आहेत. प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोना काळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही अपार मेहनत करीत आहेत, तर दुसरीकडे आपले कर्तव्य बजावताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, …

Read More »

मदतीचा हात हवा

कोरोना विषाणूच्या फैलावाची कधीही न अनुभवलेली अशी दहशत, दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झालेले आणि त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उद्ध्वस्त केले अशा भीषण अवस्थेत आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य आहेत. या सार्‍यांसोबतच रायगड जिल्ह्याला आर्थिक मदतीची गरज असून महाराष्ट्रच नव्हे तर देशही त्यांच्या पाठिशी उभा राहील …

Read More »

पनवेल तालुक्यामध्ये कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 31 नवीन रुग्ण 13 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (दि. 4) नवीन 28 रुग्णांची नोंद झाली. तसेच 13 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील नऊ, खारघरमधील आठ (ओवेपेठ येथील दोन रूग्णांसह), पनवेलमध्ये चार, …

Read More »

घरांच्या हफ्त्यांवर लागणारे विलंब शुल्क सिडकोकडून माफ

सिडको : वृत्तसेवा – सध्याच्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात सिडको महामंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास उशीर झाल्यास त्यावर भरावे लागणारे विलंब शुल्क (डीपीसी) पूर्णत: माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 22 एप्रिल ते 31 मे या कालावधीतील विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्यात येणार …

Read More »

उरणमध्ये अनेकांचे जनजीवन विस्कळीत

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाचा फटका उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला असून, आग्नेय दिशेकडून उत्तरेकडे हे वादळ चक्री फिरवत मोठ्या ताकदीने आलेल्या चक्रीवादळाने करंजा, पिरवाडी, केगाव दांडा आणि मोरा समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या. उरण तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले …

Read More »

विद्युत पुरवठा 26 तासांनंतर पूर्ववत

नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांचे परिश्रम पनवेल : वार्ताहर – निसर्ग वादळाचा फटका पनवेल शहरालासुद्धा बसून मोठ्या प्रमाणात वृक्षे उन्मळून पडली होती. त्यामुळे बुधवारी (दि. 3) सकाळी 11.30 वाजता विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तो विद्युत पुरवठा काही भागात 26 तासांनतर सुरू झाला. शहरातील पायोनियर विभागातील विद्युत …

Read More »

कर्जतमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कहर

तालुक्यातील 3000 घरांचे नुकसान कर्जत : बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही फटका बसला आहे. या चक्री वादळासह मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. तालुक्यात साधारण 3000 घरांचे नुकसान झाले असून अगणित झाडे उन्मळून पडली आहेत. तालुक्यातील मुख्य वीज वाहिन्या नेणारे …

Read More »