Breaking News

Monthly Archives: June 2020

झाड कोसळून चारचाकीचे नुकसान

नवी मुंबई : बातमीदार बेलापुर अग्रोळी गावात सोसाट्याच्या वार्‍याने झाड कोसळून चारचाकीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली. कोकण किनारपट्टीवर सलग दोन दिवस ’निसर्ग’ वादळ धडकणार असल्याने सकाळपासून नवी मुंबईत सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. या वार्‍यांमुळे सेक्टर 29 येथे उद्यानातील हे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे अरुंद असलेला …

Read More »

उरणमध्ये मोठ्या झाडांची पडझड

उरण : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार केल्याने बुधवारी (दि. 3) उरण शहरात ठिकठिकाणी छप्परांवरील पत्रे उडाले, मोठे वृक्ष कोलमडले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. उरण शहरातील बोरी गावातील माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड व उद्योजक सदानंद गायकवाड यांच्या इमारतीवरील पत्र्याची शेड उडून खाली पडली. उद्योजक सदानंद गायकवाड यांच्या घराजवळील असेलेल्या …

Read More »

चक्रीवादळाने रसायनीत नुकसान

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीत निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (दि. 3) साडेअकरा वाजल्यानंतर रौद्ररुप धारण करून सर्वत्र होत्याचे नव्हते केले. सोसाट्याच्या वादळ वार्‍याबरोबर पावसानेही रौद्र रूप धारण केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सायं साडेपाच वाजेपर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्याने चांभार्ली ते मोहोपाडा रस्त्यासहलगतची व इतर परिसरातील झाडे उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक …

Read More »

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 8909 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तर या विषाणूने आतापर्यंत 5815 लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 303 लोकांनी …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला तडाखा

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बुधवारी (दि. 3) जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे निराधार परप्रांतियांना आधार

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे विनानिवारा फसलेल्या निराधार 11 परप्रांतियांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा आधार देण्यात आला आहे.  नवीन पनवेल परिसरात 11 निराधार परप्रांतीय बिनाआधार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन पोपट यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना …

Read More »

रोह्यात मान्सूनची बरसात

रोहे ः प्रतिनिधी रोह्यात बुधवारी (दि. 3) पावसाने जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली. रोहा शहरासह ग्रामीण भागात बिगरमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मंगळवारी दुपारी 3 वाजेनंतर पावसाला सुरुवात …

Read More »

‘शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकांना मदत करावी’

कर्जत ः बातमीदार पर्यटनावर 100 टक्के अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद असून तेथील रहिवासी आणि मजूरवर्गाला कोणताही रोजगार सध्या नाही. त्यामुळे शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकाला आणि सामान्य माणसाला आर्थिक साह्य करावे, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे डोंगरावर …

Read More »

अंबा नदीपुलाजवळ झाड कोसळले; वाहतूक ठप्प

पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे पाली-वाकण राज्य महामार्गावर अंबा नदीपुलाजवळ बुधवारी (दि. 3) रस्त्यावर एक झाड कोसळले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती.  प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेत या मार्गावरून कोणीही न जाण्याच्या सूचना दिल्या. हे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने बहुतांश रस्ता व्यापला गेला होता. सोसाट्याचा वारा व पावसामुळे हे …

Read More »

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद

रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील सर्वांत जुने असलेले धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. कारखान्यातील अत्यावश्यक सेवा सुरू असून कामगारांना सुटी देण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे कामगार व सुरक्षा विभाग  कामावर आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात 36 कारखाने सुरू असून यातील 90 टक्के रासायनिक कारखाने …

Read More »