11 जणांचा मृत्यू; 375 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.24) कोरोनाचे 328 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 264 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 286 …
Read More »Monthly Archives: September 2020
बॉलिवुडचे शुद्धीकरण
आजची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतच श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग अशा अनेक फिल्मी तारकांना तसेच फॅशन डिझाइनर सिमॉन खंबांटा हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले असून त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवुडमधील दिग्गजांच्या कपाटात दडलेले किती सापळे बाहेर येतील ते आताच …
Read More »रायगड जिल्ह्यात 528 नवे पॉझिटिव्ह; 23 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 528 नव्या कोरोना रुग्णांची आणि 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 24) झाली, तर दिवसभरात 705 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 328, अलिबाग 47, पेण 34, माणगाव 21, कर्जत 20, खालापूर 18, उरण 16, महाड 15, रोहा 10, श्रीवर्धन आठ, पोलादपूर …
Read More »मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकू नये!
महाड कोविड सेंटरवरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कडाडले महाड : प्रतिनिधीकोरोना महामारी नियंत्रित करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. महाड कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा निर्माण होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जबाबदारी झटकू नये, असा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी संताप …
Read More »माझे कुटुंब, माझी जबाबदारी!
पनवेल प्रभाग क्र. 19मध्ये आरोग्य मोहिमेचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही आरोग्य मोहीम शासनाने हाती घेतली आहे. पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24) करण्यात आला.कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी …
Read More »कोरोना महामारीत काम करणार्या डॉक्टर्स आणि पत्रकारांचा सन्मान; बीड खुर्द भाजपचा स्तुत्य उपक्रम
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पसरू नये यासाठी देशांतर्गत टाळेबंदी केली तेव्हापासून ग्रामीण भागातील नागरिकांनी शहराकडे पाठ फिरवली असून, अशा काळात धीर देणारे डॉक्टर्स व आशा वर्कर तसेच पत्रकारांचा सन्मान भाजप युवा मोर्चा विभाग अध्यक्ष लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून भाजप बीड खुर्दच्या वतीने करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग पाहता …
Read More »मराठा समाजाचे आज रायगडात धरणे आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 25) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र आक्रोश आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर …
Read More »पोस्ट खात्याचा कारभार इंटरनेटअभावी ठप्प
मुरूड : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून तसेच अधूनमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे मुरूड येथील पोस्ट खात्याचा कारभार वारंवार ठप्प होत होत असून, ग्राहकवर्ग त्रस्त होत आहे. बीएसएनएल टेलिफोन कार्यालयाकडून पोस्ट कार्यालयास नेटची सुविधा पुरविली जाते, मात्र बीएसएनएलकडून नेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने आणि प्रभावी कार्यवाही होत नसल्याने ग्राहकांना …
Read More »90 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधीकर्जत तालुक्यातील कशेळे येथील अनुबाई विष्णू हरपुडे या 90 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता गावातीलच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्या आठवडाभराने सुखरूप घरी आल्या आहेत.कशेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयराम हरपुडे यांच्या मातोश्री आणि पंचायत समिती सदस्य सुरेखा अरुण …
Read More »श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी महाआघाडीत बिघाडी
शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने श्रीवर्धन : प्रतिनिधीराज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षांचे आपापल्या सोयीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्र्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडी अशा दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper