Breaking News

Monthly Archives: September 2020

रायगडात एकाच दिवशी 26 कोरोना बळींची नोंद

पनवेल : रामप्रहर वृत्त  रायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 613 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 23) झाली, तर दिवसभरात 743 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये  पनवेल तालुक्यातील 10, कर्जत, पेण, माणगाव व रोहा प्रत्येकी तीन, खालापूर दोन आणि महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …

Read More »

खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका

आगरदांडा बंदरात 200 बोटी स्थिरावल्या मुरूड : प्रतिनिधीमासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे सुमारे दोनशे बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडला. बुधवारीसुद्धा पावसाचे वातावरण होते. …

Read More »

अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात  कोविड-19च्या  रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रक्तसाठा कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालयाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत शुक्रवारी (दि. 25) कच्छी भुवन येथे महारक्तदान शिबिराचे …

Read More »

पोषण अभियानात ‘दिशा’चा सहभाग

कर्जत ः बातमीदार केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभरात पोषण महिना अभियान राबविले जात आहे. रायगडमध्ये दिशा केंद्र ही स्वयंसेवी संस्था हे अभियान राबवत असून गाव पातळीवर विशेषतः आदिवासीवाडी, पाडे व वस्त्यांवर जाऊन कुपोषण, सुपोषण आणि बालसंगोपन तसेच बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षणावर सप्टेंबर महिन्यात साजरा …

Read More »

पनवेल मनपातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेला पनवेल महापालिका हद्दीत सुरुवात झाली आहे. या मोहिमेतंर्गत नेमण्यात आलेल्या पथकाने बुधवारी (दि. 24) तळोजा फेज-1 येथे नागरिकांची आरोग्य तपासणी केली. पनवेल महापालिका हद्दीत माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 233 पथके नेमण्यात आली …

Read More »

मुरूड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू

मुरूड ः प्रतिनिधी  मुरूड समुद्रकिनारी सुमारे 44 टपरीधारक असून त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे  त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्यासुद्धा बनवण्यात येऊन पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. चहाची टपरी त्याचप्रमाणे …

Read More »

आरक्षणासाठी मराठा समाजाचा राज्य सरकारला अल्टीमेटम

10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक कोल्हापूर : प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून, मराठा नेत्यांनी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात बुधवारी (दि. 24) झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्वच्छता अभियान

कर्जत ः बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरातील भाजपच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशासह राज्यभर सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. कर्जत शहरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने माझा परिसर, स्वच्छ परिसर या संकल्पनेतून परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. …

Read More »

टाइम मॅगझिनकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान

100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाप्रसिद्ध टाइम मॅगझिनने 2020मधील जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रांतील 100 प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येते. यंदा अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. …

Read More »

एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली

खोपोली ः प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. दरडीचा मलबा मुंबई लेनवर पडल्याने तो ढिगारा काढून रोड सुरक्षित करण्यासाठी 20 ते 25 मिनिटे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील वाहतूक रोखण्यात आली होती. मंगळवारी खोपोली परिसरात जवळपास 12 तास धुवाँधार पाऊस झाला. …

Read More »