Breaking News

Monthly Archives: November 2020

शॉक ट्रीटमेंट

दिवाळीच्या अखेरच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत देता येणार नाही, ती पूर्ण भरावीच लागतील, असे सांगून हात वर केले आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसाह्य न झाल्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तोळामासा झाल्याचे सांगून त्यांनी सारे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता बिले …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार व समितीचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सन 2020 ते 2021 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी साप्ताहिक रायगड शिव सम्राट वृत्तपत्राचे संपादक रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मारुती बेव्हरेजचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरण शहरातील बोरी-पाखाडी येथील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मारुती बेव्हरेजचे मंगळवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नानालाल खारोल व रामचंद्र खारोल यांनी आमदार महेश बालदी यांचे स्वागत केले. प्रकल्पाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष …

Read More »

चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्त करा; अन्यथा आंदोलन

पनवेल भाजप युवा मोर्चाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल-माथेरान मार्गावरील चिपळे पूल ते नेरे येथील टप्प्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसे होऊ नये यासाठी रस्त्याची डागडुजी करावी; अन्यथा भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, …

Read More »

सिडको अर्बन हाटमध्ये शिल्प मेळा महोत्सव

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा दिवाळीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सिडको अर्बन हाट येथे 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत शिल्प मेळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिल्प मेळ्यात विविध राज्यांतील कारागीर सहभागी होणार असून त्यांनी निर्मिलेली हातमाग व …

Read More »

राष्ट्रीय आयुर्वेद दिन पनवेलमध्ये उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जोशी पंचकर्म क्लिनिकच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोशी पंचकर्म क्लिनिकच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. …

Read More »

रायगडातील मंदिरांत लगबग

पाली : प्रतिनिधी अष्टविनायक देवस्थानांपैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिर   सोमवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आतुर झालेले भक्त भाविक, पर्यटक आता सुखावले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पाली (ता. …

Read More »

खारघरच्या तरुणांनी साकारली सिंहगडाची प्रतिकृती

खारघर ः प्रतिनिधी महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी, संस्कृती व परंपरेची आठवण किल्ल्यांच्या साक्षीने जागृत करावी, तसेच किल्ले बनवून त्याप्रति आपली आत्मीयता प्रकट करणे व आपले दिवाळीतील लहानपण जागे करण्याच्या हेतूने खारघरमधील युवकांनी एकत्र येऊन सचिन तेंडुलकर मैदान सेक्टर 21 या ठिकाणी सिंहगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली …

Read More »

खंडित बससेवा पूर्ववत करा -उज्ज्वला झंजाड

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1मधील नागरिकांसाठी काही वर्षांपूर्वी परिवहन सेवेने सुरू केलेली बससेवा बंद केली आहे. परिणामी या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना आपल्या हक्काच्या बससेवेचा लाभ घेता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर येथील नागरिक व चाकरमान्यांना वाशी, ऐरोली येथे येण्या-जाण्यासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग 1च्या …

Read More »

‘आरएसएस’चा वनवासींसोबत दिवाळी फराळ

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस)वतीने दुंदरेवाडी, तामसईवाडी, करंजाडे येथील फणसवाडी आणि भोंगळपाडा या वनवासी वस्त्यांवर रविवारी (दि. 15) दिवाळीनिमित्त वनवासी बांधवांबरोबर दिवाळी फराळ करण्यात आला. या वेळी पनवेलमधील तरुण मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास या वाड्यांवर स्वयंसेवक पोहचले. एक देशभक्तीपर गीत त्यांच्या समवेत गाण्यात …

Read More »