Breaking News

Monthly Archives: November 2020

नाभिक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश मोरे

नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा नाभिक समाज बांधवांची सभा  सोमवारी (दि. 9) जनार्दन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वाकण येथील हॉटेल बाळाराम येथे झाली. या बैठकीत महाडचे दिनेश मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीसुध्दा निवड करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी सोपान मोहिते (रोहा), उपाध्यक्ष विनोद पवार (उरण), मोहन चव्हाण …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस आजन्म कारावास

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन आणि तिला धमकावून तिच्यावर सहा वर्षे बलात्कार करणार्‍या आरोपीला येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. मोरेश्वर उर्फ नारायण गोविंद पेरेकर (रा. रेवस कोळीवाडा, ता. अलिबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही …

Read More »

कंत्राटदार साजरी करणार काळी दिवाळी

थकीत देयके न दिल्यास काम बंद आंदोलन पाली : प्रतिनिधी कंत्राटदारांची थकीत देयके दिवाळीपूर्वी अदा केली नाही तर 25 नोव्हेंबरपासून स्थानिकस्तरावर काम बंद आंदोलन, नंतर शासकीय कार्यालयास कुलूप लावून ठिय्या आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम व संबंधित …

Read More »

आ. मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या दिवाळेतील फगवाले जेट्टीचे लोकार्पण

नवी मुंबई : बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या दिवाळे गावातील फगवाले जेट्टीचा उद्घाटन सोहळा भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) झाला. या वेळी जेट्टीच्या कामास 65 लाख रुपये इतका खर्च झाला असून पुढील रेलिंगच्या कामांसही …

Read More »

बँड आणि बँजो पथकांची उपासमार; नवी मुंबईतील वाजंत्र्यांचे आठ महिन्यांत 10 कोटींचे नुकसान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक गोष्टींना आळा बसला आहे. लग्न, उत्सव, वाढदिवस, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांना वाद्य वाजविण्यास सरकारने अद्याप परवानगी न दिल्यामुळे नवी मुंबईतील 23 बँड पथके आणि 70 बँजो पथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांचे आठ ते 10 कोटी रुपयांचे …

Read More »

एसटीचे गुन्हेगार

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या दोघा कर्मचार्‍यांनी केलेल्या आत्महत्या या खरोखरीच कुणाही संवेदनशील नागरिकाला अस्वस्थ करतील अशा आणि वेदनादायी आहेत. कोरोनाच्या या भीषण संकटकाळात समाजातील काही घटकांची किती असह्य परवड झाली असावी याचे हे अतिशय बोलके उदाहरण म्हणावे लागेल. लागोपाठ दोन एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आल्यानंतर सरकारने दोन महिन्यांचे वेतन देऊ …

Read More »

पक्षविरोधी कार्यवाहीबद्दल गणेश वाघिलकर सहा वर्षांसाठी निलंबित

पनवेल : पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल तक्का येथील गणेश वाघिलकर यांचे भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी वाघिलकर यांना निलंबन पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपण आपल्या गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरोधात अपप्रचार व त्यांची खोटी बदनामी …

Read More »

तक्का परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा -नगरसेवक अजय बहिरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त   पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव परिसरातील विजेच्या समस्यांचे निवारण करून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक अजय बहिरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा सोबत होते. नगरसेवक अजय बहिरा यांनी निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक …

Read More »

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व वोकल फॉर लोकल या संकल्पनेतून आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले होते. प्रभागातील …

Read More »

पक्षी सप्ताहानिमित्त ‘सीकेटी’मध्ये कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षी 5 नोव्हेंबर हा पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि 12 नोव्हेंबर हा डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस असल्याने हा सप्ताह महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहानिमित्त सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग …

Read More »