मुरूड ः प्रतिनिधी एसटी महामंडळातील चालक-वाहक, तांत्रिक विभाग, लिपिक आदी सर्व घटकाला मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी वृंदांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खोलीचे भाडे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. सर्वांत कमी पगार एसटीमधील कर्मचार्यांना दिला जातो. त्यातच तीन महिने पगार नसल्याने कुटुंबाची …
Read More »Monthly Archives: November 2020
सीमेवरील जवानांसाठी पौष्टिक लाडू; ‘भाविप’ची अनोखी दिवाळी
पनवेल ः वार्ताहर लेह, लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथे सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम भारत विकास परिषद संस्थेच्या पनवेल शाखेच्या वतीने या वर्षी प्रथमच राबविण्यात आला. एकूण 14 हजार पौष्टिक लाडू वेगवेगळ्या सीमेवर पाठविण्यात आले. भारतीय सैनिकांना दिवाळी फराळ पाठवावा ही प्रेरणा मुळात गेली काही वर्षे …
Read More »फटाके विक्रीस तूर्त मोकळीक; नवी मुंबईतील गर्दीवर मात्र दक्षता पथकांची नजर
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, मात्र बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास …
Read More »देशात मोदी लाट कायम
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची मुसंडीविविध राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही सरशी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जबरदस्त यश मिळविले आहे. मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र मंगळवारी (दि. 10) मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी …
Read More »यंदा ऑनलाइन ‘दिवाळी पहाट’
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संक्रमण पाहता यंदा भाजप पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 14) रोजी ऑनलाईन दिवाळी पहाट 2020 या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पहाट उपक्रमाचे या वर्षीचे हे 10 वर्ष आहे.शनिवारी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंत …
Read More »…तर रस्त्यावरील लढाई तीव्र करू!
ओबीसी गोलमेज परिषदेचा राज्य सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधीमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मुद्द्यांवर मुंबईतील मराठी पत्रकार संघात मंगळवारी (दि. 10) गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पत्र लिहिणार्या आमदार संजय शिंदे यांचा …
Read More »पनवेल एसटी बसस्थानकात भाजपची जोरदार निदर्शने
राज्य सरकारकडून जनतेची सातत्याने फसवणूक -आमदार प्रशांत ठाकूरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तजनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील जनतेची सातत्याने फसवणूक केली आहे. या सरकारचा कारभारच निष्क्रिय आहे. त्यामुळे स्वतःला राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणवून घेणारे, मात्र तसे कर्तव्य …
Read More »ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करा
महाड एसटी स्थानकात भाजपचे आंदोलन महाड : प्रतिनिधी – पगाराविना आर्थिक विवंचनेत एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत, त्यांच्या आत्महत्येस राज्यातील ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत महाड भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 10) येथील एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत उत्तम सेवा …
Read More »नियमांच्या चौकटीत दिवाळी
कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. परंतु लोकांनी जणु काही कोरोना महामारी संपुष्टात आल्यासारखे वर्तन सुरू केलेले दिसते. गावोगावच्या बाजारपेठांमधली गर्दी बघितली की कोरोनाची दुसरी लाट फार दूर नाही असा नकारात्मक विचार बळावतो. सर्वच ठिकाणी गर्दी टाळायला हवी आहे, तसेच कोरोना रुग्णांना प्रामुख्याने श्वसनाचा त्रास जाणवतो हे लक्षात घेऊन सगळ्यांनीच फटाके …
Read More »पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची होणार स्थापना
पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना करण्यात येणार असून यासाठी इच्छुक व्यक्ती तसेच संस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व विकसन संचालक भरतकुमार व्हावळ यांनी केले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिम्पिककरिता शिफारस केलेल्या सहा निवडक क्रीडा प्रकारांत बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराचा दुसरा क्रमांक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper