Breaking News

Monthly Archives: November 2020

आणीबाणीची आठवण

गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून राज्य सरकारवर तोफा डागल्या होत्या. त्याचा सूड म्हणून त्यांना अटक करण्याची ही कारवाई करण्यात आल्याची टीका होत आहे. आपल्या विरोधात बोलणार्‍या टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे हे ठाकरे सरकारचे उपाय लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे तर आहेतच, परंतु कुठल्याही प्रकारे विचार केला तरी ते …

Read More »

रायगडात 158 नवे कोरोना रुग्ण; एक जणाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 122 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 21) तालुक्यातील 105, अलिबाग 15, पेण नऊ, उरण व खालापूर प्रत्येकी आठ, रोहा व महाड प्रत्येकी …

Read More »

माथेरानच्या राणीचा पर्यटन हंगाम सुरू

कर्जत : बातमीदार पर्यटकांची लाडकी मिनिट्रेन गुरुवार (दि. 4)पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली, मात्र नेरळ-माथेरान प्रवासाला सहा तास लागल्याने मिनिट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांचा पुरता हिरमोड झाला. दुपारी सव्वा वाजता पोहचलेल्या मिनिट्रेनने माथेरान-अमन लॉजदरम्यान 79 प्रवासी पर्यटकांना सोबत घेऊन पर्यटन हंगामाची सुरुवात केली. कोविड अनलॉकमध्ये मिनिट्रेनची प्रवासी सेवा सुरू झाली …

Read More »

आज उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक आणि नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम; प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून न्यू इंग्लिश स्कूल उभारणीचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे येथून पुष्पक नोडमध्ये स्थलांतरित झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या कामाची रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 4) पाहणी करून आढावा घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून या शाळेची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. विमानतळबाधित उलवे गावाचे …

Read More »

अर्णब गोस्वामी यांना अटक; भाजपची निदर्शने

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी (दि. 4) मुंबईतून अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ अलिबाग येथे भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अन्वय नाईक व त्यांच्या आईचा मृतदेह 4 मे …

Read More »

राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे आजपासून सुरू

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह गुरुवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलाव उघडण्यास तसेच योगा इन्स्टिट्यूट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे. राज्य …

Read More »

पेणमध्ये मूर्तीकार व निराधार महिलांना धान्य वाटप

मेकिंग द डिफरन्स संस्थेचा उपक्रम पेण : प्रतिनिधी मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात सुरू असून लॉकडाऊन व चक्रीवादळ या संकटामुळे मूर्तिकार व कामगार यांचे नुकसान झाले. त्यांना मदत करताना  वेगळेच समाधान मिळत आहे. संस्थेतर्फे यापुढेही या परिसरात अशीच मदत केली जाईल, असे प्रतिपादन  संस्थेचे अध्यक्ष दीपक विश्वकर्मा यांनी …

Read More »

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

हेल्पींगहॅन्ड सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील चाहुचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कल्याण येथील हेलपिंगहॅन्ड या सामाजिक संस्थे तर्फे शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी शाळेचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांनी हेलपिंगहॅन्ड या संस्थेशी संपर्क करून चाहुचीवाडी शाळेतील पहिली ते पाचवीच्या …

Read More »

नेरळ-कळंब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बुधवारपासून बेमुदत उपोषण

कर्जत : बातमीदार माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ-कळंब रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे बुधवार (दि. 11) पासून बेमुदत उपोषण करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी नेरळ-कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण …

Read More »