Breaking News

Monthly Archives: November 2020

स्वदेस फाऊंडेशनतर्फे शेळी संचाचे वाटप

पाली : प्रतिनिधी स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव विकास समिती मार्फत नुकतेच पाली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सुधागड तालुक्यामधील 15 गावातील 26 आदिवासी बांधव व शेतकर्‍यांना शेळी संचाचे वाटप करण्यात आले.  उस्मानाबादी जातीच्या दोन शेळ्या व प्रथमोपचार साहित्य यांचा या शेळी संचात समावेश असून, बाजार भावाप्रमाणे प्रत्येक संचाची किंमत 19हजार रुपये इतकी …

Read More »

निधीअभावी रस्त्याचे काम रखडले

 साळाव ते आगरदांडा राज्यमार्ग गेला खड्ड्यात मुरूड : प्रतिनिधी मुरुड हा पर्यटन तालुका आहे. मात्र राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी प्राप्त होत नसल्याने मुंबईला जोडणार्‍या साळाव ते आगरदांडा या मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. त्याचा त्रास स्थानिकांबरोबरच पर्यटकांनासुद्धा सहन करावा लागत आहे. साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी राज्यमार्ग  योजनेअंतर्गत सात …

Read More »

मिठाचा खडा

कांजूरमार्गची जागा मिठागराची असून त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. सबब ही जागा मुंबई महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाला परस्पर हस्तांतरित करणे नियमबाह्य आहे. या जागेवर परस्पर कारशेड उभारली जात असून त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे, असे पत्र केंद्र सरकारतर्फे राज्याच्या मुख्य सचिवांना धाडण्यात आले आहे. याचा अर्थ एवढाच की ठाकरे …

Read More »

ओबीसी समाजाकडून आरक्षणासाठी तहसीलसमोर निदर्शने

अलिबाग : प्रतिनिधी ओबीसी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण बचाव करण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 3) जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी बांधवानी एकत्रित येऊन आंदोलन करून निदर्शने केली. रायगड जिल्ह्यातही ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन सर्व 15 तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात …

Read More »

‘लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती’

’मेट्रो’वरून भाजपचा टोला मुंबई : प्रतिनिधी ठाकरे सरकारने आरेमधीलमेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएपे कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्राने कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसे पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवले आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्रकल्प …

Read More »

रायगडात 108 नवे कोरोना रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 108 नव्या कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 160 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण 9) तालुक्यातील 68, अलिबाग 10, पेण नऊ, रोहा चार, उरण, कर्जत व श्रीवर्धन प्रत्येकी तीन, खालापूर व …

Read More »

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा या मागणीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मशाल मोर्चा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन मराठा …

Read More »

भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई; ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी धडाकेबाज भारतीय लष्कराकडून कारवाया केल्या जात आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात 12 महिन्यांच्या कालावधीत 157 दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. दोन दिवसांपूर्वीच पुलवामा येथील मलंगपुरामध्ये राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत …

Read More »

माथेरान-अमन लॉज शटल सेवा आजपासून

कर्जत : बातमीदार मिनिट्रेनची माथेरान ते अमन लॉज शटल बुधवार (दि. 4)पासून धावणार आहे. कोरोनामुळे माथेरान ठप्प झाल्यानंतर काही दिवसांत मिनिट्रेनसुद्धा बंद करण्यात आली. तेव्हापासून शटल सेवाही बंद होती. अनलॉक अंतर्गत 2 सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक येऊ लागले, पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटरचे अंतर चालताना पर्यटकांची …

Read More »

विकासासाठी कटिबद्ध -आमदार महेश बालदी; बेलपाडा रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त जेएनपीटी बंदराच्या विकास निधीतून दास्तान फाटा ते बेलपाडा गावातील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होत आहे याचा आम्हा लोकप्रतिनिधींना निश्चित अभिमान वाटत असून, बेलपाड्यासह विविध गावांच्या विकासासाठी या मतदारसंघाचा लोकसेवक म्हणून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार …

Read More »