Breaking News

Yearly Archives: 2020

महानगरपालिकेचे परिपत्रक इंग्रजीतूनही देण्याची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई हे कॉस्मोपोलिटन शहर असल्याने विविध जातीधर्माचे व प्रांतातील नागरिक येथे राहत आहेत. त्यामुळे पालिकेने लॉकडाऊन, कोविड व नव्या नियमांच्या संदर्भातील परिपत्रक मराठीसोबतच इंग्रजीतही द्यावे. अनेक अमराठी नागरिकांना पालिकेच्या मराठीतील परिपत्रकाचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अनेकदा माहिती पोहचत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो.मुंबई महापालिकादेखील मराठी व …

Read More »

गुड न्यूज आहे पण…

महाराष्ट्रात बुधवारपासून अनलॉक 3च्या नव्या नियमावलीनुसार बर्‍याच गोष्टी चार महिन्यांनंतर प्रथमच खुल्या होणार आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काहिशी स्थिरावल्यासारखी भासत आहे, पण अद्याप चार-दोन दिवसच झाल्यामुळे लगेच काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मॉल, दुकाने उघडल्यामुळे जनजीवन पूर्ववत झाल्यासारखे भासून अनेकांना हायसे वाटणार आहे. ही गुड न्यूज आहे …

Read More »

पनवेल तालुक्यात 122 नवीन रुग्ण

   तिघांचा मृत्यू; 173 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात  मंगळवारी (दि. 4) कोरोनाचे 122 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू  झाला, तर 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाल्याने …

Read More »

ऐतिहासिक राम मंदिराचे आज भूमिपूजन; देशभरात उत्साह

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून, संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भूमिपूजन सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन सहकारी भगिनी व बंधूंनो.. सप्रेम नमस्कार!

5 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन. या जन्मदिनी आपण आवर्जून प्रत्यक्ष भेटून अथवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुभेच्छा देत असता. आपल्या या शुभेच्छा मलाही सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देत आल्या आहेत. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एकत्र येण्यावर व सामाजिक कार्यावर बंधने आली आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण सहभागी …

Read More »

सिडको गृहप्रकल्पातील ग्राहकांची कागदपत्रे दाखल करताना तारांबळ

पनवेल ः बातमीदार सिडकोने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील ग्राहकांना ऑनलाइन कागदपत्रे दाखल करताना व हप्ते भरताना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. सिडकोने ही सर्व प्रक्रिया एका खासगी माहिती तंत्रज्ञान कंपनीला दिली आहे. काही संवेदनशील कागदपत्रे सिडकोत सादर करण्यास गेलेल्या ग्राहकांनाही माघारी परतावे लागले, मात्र …

Read More »

जनतेचा लोकसेवक

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वसा समर्थपणे चालवत समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यांसह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील पदे भूषविली असली तरी …

Read More »

‘राम मंदिर भूमिपूजन सोहळा सणासारखा साजरा करा’

नवी मुंबई ः बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य राम मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि. 5) होत आहे. नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसाठी हा आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असल्याने हा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी घरी राहून दिवाळी-दसर्‍यासारखा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. अयोध्येत …

Read More »

नवी मुंबईतील मॉल्स सज्ज

आजपासून लगबग वाढणार; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना पनवेल ः बातमीदार मिशन बिगिन अगेन अंतर्गत बुधवारपासून (दि. 5) शहरातील मॉल्स सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जवळजवळ साडेचार महिन्यांनंतर मॉल्सचे शहर असलेल्या नवी मुंबईतील लगबग वाढणार असून, मॉल्स व्यवस्थापनानेही सामाजिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर : कोरोना योद्धा

वैश्विक महामारी कोरोनामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. कोविड-19 विषाणूबद्दलची नागरिकांमधील दहशत चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यामुळेच अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊनदेखील जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. अशा या आपत्तीमध्ये फार कमी लोकप्रतिनिधी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी कार्यरत आहेत. …

Read More »