Breaking News

Yearly Archives: 2020

बारावीच्या परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे सुयश

एकूण 99.01 टक्के निकाल पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (नवीन पनवेल) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन …

Read More »

एका अनिश्चित उद्याची तयारी

बारावीचा निकाल लागला आहे. लवकरच दहावीचाही लागेल. पास होणार्‍यांचे आणि उत्तम गुण मिळवणार्‍यांचे कौतुक आहेच. परंतु पास झालो, पुढील प्रवेश मिळाला म्हणजे सुटलो, इतकी सोपी आता शैक्षणिक वाटचाल कुणासाठीच राहिलेली नाही. तंत्रज्ञानातील मोठे आविष्कार उद्याचे जग बदलून टाकणारच आहेत. त्या बदलांना कोरोनाने आणखी समीप आणून ठेवले आहे. आगामी काळ आत्यंतिक …

Read More »

उरण तालुक्यातून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी दिपाली परब यांनी दिली आहे. उरण तालुक्यातुन बारावीच्या परीक्षेत 1771 विद्यार्थी बसले होते. यामध्ये विज्ञान शाखा 625, वाणिज्य शाखेत 702 तर कला विभागात 445 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी विज्ञान शाखेतून 624, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेजचा बारावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.  विद्यार्थ्यांनी घवघवीत …

Read More »

कर्जत तालुक्यात 26 जण पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाने तीनशेचा टप्पा पार आला असून गुरुवारी एका माजी नगरसेवकासह 26 नवीन रुग्ण आढळले असून आत्तापर्यंतच्या आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 311 गेली असून 155 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांत नेरळ तीन, कर्जत नऊ, मुद्रे दोन, …

Read More »

पनवेल तालुक्यात 197 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 167 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 16) 197 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 167  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा …

Read More »

वाढदिवसानिमित्त गणेशनगरमधील शिक्षकांकडून श्रमदान मोहीम

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुका पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेशनगरमधील सर्व शिक्षकांनी गुरुवारी (दि. 16) मराठा समाज भवन ते गणेशनगरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी काढून मार्ग मोकळा करून दुरुस्ती केली. पाली मढाळी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे तेथे पाणी साचल्याने येथून मार्ग काढणे अवघड …

Read More »

श्रद्धा फाऊंडेशनकडून अपंगांना मदत

कर्जत ः बातमीदार गतिमंद लोकांसाठी काम करणार्‍या श्रद्धा फाऊंडेशनने लॉकडाऊन काळात गरीब-गरजूंना मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार मागील काही दिवस कर्जत तालुक्यातील सर्व भागांत जाऊन आदिवासी, विधवा आणि गरजूंना धान्याच्या स्वरूपात मदत केली जात आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग आणि अपंग लोकांनादेखील मदत पोहचविली जात असून नेरळ परिसरातील 73 …

Read More »

लॉकडाऊनमध्ये व्यापार्‍यांकडून ग्राहकांची लूट; जीवनावश्यक वस्तूंच्या

दरात दुपटीने वाढ मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत.  याचा गैरफायदा घेत काही किराणा व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी दोन-चार दिवसांतच भाज्यांचे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात …

Read More »

नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध राहणार -आयुक्त अभिजीत बांगर

नवी मुंबई : बातमीदार  – नागरिकांमदमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासठी प्रशासन कटिबद्ध आहे. कार्यक्षमतेत वकार्यपूर्ततेत कसलीही हयगय केली जाणार नाही. नवी मुंबईचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून यापूढे माझ्यासह सर्वच अधिकारी नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध असतील याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. मंगळवारी आयुक्त बांगर …

Read More »