Breaking News

Yearly Archives: 2020

कोप्रान कंपनीविरोधात कामगारांचे उपोषण

खालापूर : प्रतिनिधी आपल्याला कामावर घ्यावे, या मागणीची तड लावण्यासाठी संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार या कंत्राटी कामगारांनी कोप्रान कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार हे दोघे कोप्रान कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सोळा वर्षापासून काम करीत होते. त्यांना कोणतीही सूचना न देता ऐन दिवाळीच्या …

Read More »

गुरे पळवून कत्तल करणारी टोळी गजाआड

आरोपी मुंब्रा, भिवंडी, कल्याण भागातील अलिबाग : प्रतिनिधीठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून रायगड जिल्ह्यात येऊन गुरे पळवून त्यांची कत्तल करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) जेरबंद केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व …

Read More »

मांडला ते काकळघर रस्त्याची दुरवस्था; जनआंदोलनाचा इशारा

रेवदंडा : प्रतिनिधी जागोजागी खड्डे पडल्याने मांडला ते काकळघर या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून, येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मांडला व काकळघर ग्रामपंचायतींच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मांडला ते काकळघर दरम्यान या रस्त्यावर सात गावे …

Read More »

कोरोनासंदर्भात पनवेल मनपाची आढावा बैठक; लशीच्या पूर्वतयारीबद्दलही चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनासंदर्भात महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या लशीसंदर्भात काय पूर्वतयारी करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मते …

Read More »

मुख्यमंत्री कोकणात आले कधी, गेले कधी समजलेच नाही!

चिपळूण : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 10) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून भुयारीमार्गे चौथ्या टप्प्यात आले आणि पाहणी करून पुन्हा माघारी परतले. त्यामुळे पोफळी व आलोरेवासीयांसाठी त्यांचा दौरा केवळ उत्सुकतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री अलोरेत आले कधी गेले कधी …

Read More »

नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीयत्वाच्या विचारांनी ओतप्रोत संसद भवनाच्या निर्मितीचा शुभांरभ हा आपल्या लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असेल. नव्या भारताच्या उभारणीचे ते साक्षीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 10) येथे केले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातंर्गत संसद भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान …

Read More »

जागतिक दिव्यांग सप्ताह उत्साहात

पनवेल ः वार्ताहर भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, पण या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव यांनी कार्यक्रमाचे सातत्य राखण्यासाठी तसेच मुलांचा व पालकांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

जेएनपीटीला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’चा पुरस्कार

उरण ः वार्ताहर भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जेएनपीटीला प्रतिष्ठित अशा सहाव्या अटल शास्त्र मार्केनोमी पुरस्कार 2020मध्ये ‘भारतातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने जेएनपीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जेएनपीटीला सलग तिसर्‍यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. जेएनपीटीचे डेप्युटी कंजरवेटर कॅप्टन अमित …

Read More »

वेश्या व्यवसाय चालवणारी महिला जेरबंद

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई पनवेल ः वार्ताहर वेश्या व्यवसाय चालवणार्‍या महिलेस नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा फेज-2मधील सिल्व्हर लाइफ स्टाइल इमारतीतील घरावर छापा मारून अटक केली आहे. या वेळी पथकाने वेश्या व्यवसायासाठी बोलाविण्यात आलेल्या दोन मुलींचीही सुटका केली आहे. तळोजा से. 20 भागात शाल्या …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना खारघर वसाहतीत घडली. खारघर परिसरातील एक महिलेने मागील 10 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा तक्रार अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे दिला आहे. महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी या प्रकरणाची सखोल …

Read More »