Breaking News

Yearly Archives: 2020

राज्य सरकारमध्ये विसंवाद; देवेंद्र फडणवीस यांची टीका; चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारने रविवारी (दि. 23) आयोजिलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला. ’सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापान व सुसंवादासाठी बोलवावे,’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

सुशिलकुमार शर्मा यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप तालुका उपाध्यक्ष सुशिलकुमार शर्मा यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, …

Read More »

जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या लेक्चर सिरीजला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 23) …

Read More »

खारघर शहर नवीन कार्यकारणीचे मान्यवरांकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची खारघर शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे रविवारी (दि. 23) अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यकारणीमध्ये खारघर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षपदी वनीता विजय पाटील, खारघर …

Read More »

एलईडी मासेमारी बिनबोभाट सुरूच

300हून अधिक बोटी महिनाभरापासून किनार्‍यावरच अलिबाग ः प्रतिनिधी बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपरिक मासेमारांना हात हलवत परत यावे लागत आहे. त्यामुळे रेवस आणि बोडणी येथील मच्छीमारांनी आपल्या 300 मासेमारी बोटी गेल्या महिनाभरापासून किनार्‍यावरच नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील …

Read More »

पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ : मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी देशातील हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावणी देणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. वारिस पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ झाले आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण …

Read More »

तळोजा आत्महत्या प्रकरण; व्हॉट्सअॅ प डिपीतून मृत्यूशी संवाद

पनवेल : वार्ताहर तळोजात कुटुंबासह आत्महत्या करणारे नितीश उपाध्याय यांनी घरात दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट्स लिहून ठेवल्या होत्या, तसेच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप डिपीवर मृत्यूशी संवाद साधत असल्याचा फोटो ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तळोजा फेज 1मधील शिवकॉर्नर सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणार्‍या उपाध्याय कुटुंबीयांनी आर्थिक संकटातून गळफास घेऊन आत्महत्या केली …

Read More »

राज्यात महिला हत्यांचे सत्र सुरूच; नगरमध्ये पत्नीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

अहमदनगर ः प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची घटना अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. लेंडेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात …

Read More »

पंतप्रधान नरेेंद्र मोदींकडून कर्तृत्ववान महिलांचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भागीरथी अम्मा, काम्या कार्तिकेयन यांच्यासह पूर्णियाच्या महिलांचे कौतुक केले, तसेच या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) युवा विज्ञानी कार्यक्रम अर्थात ’युविका’चाही उल्लेख केला. 12 वर्षीय काम्या कार्तिकेयन हिने दक्षिण अमेरिकेचे सर्वांत उंच शिखर (7 हजार …

Read More »

कामोठे : रविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. त्यांचे आयोजक रविशेठ जोशी यांनी स्वागत केले. जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी …

Read More »