पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. तुकाराम नारायण घरत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासह वसंत पाटील, रामदास ठाकूर, विजय घरत, वामन म्हात्रे, श्रीकांत घरत, शेखर देशमुख, रोहित घरत, कुणाल घरत, शुभांगी घरत, …
Read More »Monthly Archives: January 2021
नवीन पनवेलमध्ये फूटपाथच्या नवीन कामाला सुरुवात
नगरसेविका सुशिला घरत, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांच्या प्रयत्नांचा यश पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल मधील अभ्युदय बँक ते आयप्पा मंदिरा लगत असणारा फूटपाथ डागडुजी ऐवजी नवीन करण्यात यावा, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग ’ड’ समिती सभापती भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदिश घरत व माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी सिडकोकडे …
Read More »उरण तालुक्यात 75.28 टक्के मतदान
70 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या 70 जागांसाठी शुक्रवारी (दि. 15) झालेल्या निवडणूकीसाठी 75.28 टक्के मतदान झाले झाले. त्यात चाणजे 71.29, केगाव 78.28, नागाव 77.27, म्हातवली 78 .91, फुंडे 87.14, वेश्वी 90.50 टक्के मतदान झाले. सहा ग्रामपंचायतीत 30463 मतदार असून त्यातील 22,932 मतदारांनी मतदान …
Read More »पनवेलमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते
कोरोना लशीच्या मोहिमेचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूपासून रक्षण करणार्या कोविशील्ड या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते झाला. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये राबविण्यात येणार्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या …
Read More »नोकरीसाठी 221 प्रमाणपत्रधारकांची यादी शासनाकडे सुपूर्द
‘रिलायन्स’विरोधात प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात आंदोलनास बसणार्या आंदोलनकर्त्यांचे अर्धशतक पूर्ण झाले असून, शनिवारी (दि. 16) 51वा दिवस होता. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने पहिल्या फेरीत 221 प्रकल्पग्रस्तांची यादी रोह्याच्या प्रांताधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी देण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली. प्रांताधिकारी डॉ. …
Read More »पेणमध्ये रंगला महिलांचा पतंगोत्सव
पेण : प्रतिनिधी मकरसंक्रांतीच्या दिवशी गुरुवारी पेणमध्ये नगरपालिका मैदानावर महिला पतंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला अत्याचारविरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली नऊ वर्षे साजरा करण्यात येतो. शालेय विद्यार्थी या पतंगोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पतंगोत्सवाची माहिती व जनजागृती करण्यासाठी गुरुवारी दुपारी …
Read More »राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश पालकर
पोलादपूर : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार आणि दै. राम प्रहरचे पोलादपूर प्रतिनिधी शैलेश वसंत पालकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी पालकर यांची नियुक्ती केल्याचे नियुक्तिपत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी …
Read More »रायगडात लसीकरणाला प्रारंभ
जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला पहिला डोस अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रांवर शनिवारी (दि. 16) कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्य कर्मचार्यांपासून करण्यात येत आहे. अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा शासकीय …
Read More »प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान -जयप्रभा विजय महाराज
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी समर्पण संपर्क अभियानाच्या खोपोली कार्यालयाला जैन मुनींची भेट खोपोली : प्रतिनिधी प्रभू श्रीराम यांनी मर्यादा सोडली नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बोलले जाते. आपल्या शत्रूबद्दलही ते नेहमी आदर ठेवत. चांगला व्यवहार त्याचप्रमाणे प्रजेवर नितांत प्रेम यामुळेच प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याचे जैन मुनी …
Read More »शेअर बाजार म्हणजे लॉटरी नव्हे!
शेअर बाजारात अशक्य काही नसलं तरी अवाढव्य नफा थोड्याच अवधीत मिळणं हे लॉटरी लागण्यासारखंच असतं आणि म्हणून प्रत्येक वेळी अशी लॉटरी लागेल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं ठरू शकतं. जर आपली आर्थिक उद्दिष्टे अशा अवास्तव गृहितकांवर आधारित असतील, तर भविष्यात आपण नक्कीच अडचणीत येऊ शकतो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper