Breaking News

Monthly Archives: January 2021

धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत, त्या प्रकरणीही कोणत्याही चौकशी यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत …

Read More »

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; कोविड योद्ध्यांना प्राधान्य -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या वेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचे अभिनंदन करून कोरोना योद्ध्यांना लसीसाठी प्राधान्यक्रम असेल, असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्याला सगळ्यात जास्त …

Read More »

बीड, यवतमाळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव

कोंबड्या, मोर आणि कावळे दगावले; गावांत अलर्ट जाहीर बीड, यवतमाळ : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात व यवतमाळ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. आंबेजोगाईच्या येथील लोखंडी गावात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील 10 गावांत अलर्ट जाहीर करण्यात आला असून कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचे आदेश …

Read More »

पनवेलमध्ये रस्त्याची दुरुस्ती

नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून घेतली आहे. येथील ब्रिज खाली रस्त्यावर भरपूर खड्डे पडले होते. तरी ट्राफिक पोलीस व लक्ष्मी वसाहतमधील नागरिकांनी प्रभाग ‘ड’ समिती नगरसेवक राजू सोनी यांना फोन करून बोलविले …

Read More »

भिंगारवाडी येथील अपघातात एक ठार; पाच जखमी

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील मनोज ढाब्यासमोर भिंगारवाडी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी 7.30 च्या सुमारास टेम्पो, ट्रेलर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार तर पाच जखमी झाले आहेत. मोटार सायकलवरील फिर्यादी एडविन लुईस फर्नांडीस (20 रा. बांद्रा) हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन जुना पुणे-मुंबई महामार्गाने …

Read More »

पोलादपूरमध्ये पायांवरून बस गेल्याने प्रवासी गंभीर जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. 15) रात्री ठाणे- चिपळूण बसचे पुढील चाक एका वृध्दाच्या दोन्ही पायांवरून जाऊन तो जखमी झाला. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये एसटी बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर बस स्थानकात शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास चिपळूण-ठाणे बस (क्र. एमएच13-सीयु6550) थांबली होती. …

Read More »

…तर नुकसानभरपाई देणार

कोव्हॅक्सिन साईड इफेक्टबाबत भारत बायोटेकची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरणाला भारतात आजपासून सुरुवात झाली. भारतात या लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजच्या लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लशीला विरोध झाल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन लस निर्मिती …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमी

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले तसेच याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना …

Read More »

ब्रिस्बेन कसोटीत पावसाची खेळी; दुसर्‍या दिवसाखेर भारत दोन बाद 62

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसाने हजेरी लावली. सतत कोसळणार्‍या पावसामुळे पंच आणि सामनाधिकार्‍यांनी खेळ थांबवला. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या …

Read More »

ठिबक सिंचन पद्धतीने होणार महामार्गावरील झाडे हिरवीगार

पनवेल : वार्ताहर जेएनपीटी महामार्गावरील दुभाजकावर लावण्यात आलेले वृक्ष कायमस्वरूपी हिरवेगार ठेवता यावेत या करिता राष्ट्रीय रस्ते प्राधिकरनाकडून ठिबक सिंचन पद्धतीचा (ड्रीप इरिगेशन सिस्टीम)वापर करण्यात येत आहे. कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त वृक्षांना पाणी देण्यासाठी या सिस्टीमचा वापर करण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या …

Read More »