Breaking News

Monthly Archives: February 2021

जेएनपीटीच्या कामगारांना दिलासा

थकबाकीची रक्कम अदा; आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण ः वार्ताहर जेएनपीटी टाऊनशिपमधील कचरा, गारबेज उचलणार्‍या कामगारांना कोणत्याही प्रकारची अग्रिमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. अशा कामगारांना मागील पाच वर्षांपासूनची थकबाकी मिळवून देण्याचे काम जेएनपीटी जनरल कामगार संघटनेने केले आहे. थकबाकीपोटी प्रत्येक कामगाराला सुमारे दीड लाख रुपये मिळवून देण्याचे काम युनियनच्या माध्यमातून …

Read More »

आपला तो बाब्या…

सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना साधनशुचिता पाळावयाची असते हे काही नेते पूर्णत: विसरून गेले आहेत. किंबहुना, सामाजिक जीवनात काही मूल्ये पाळावीच लागतात हे त्यांच्या गावीच नसते. अशा अनीतीमान राजकारण्यांचे सध्या फावते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सत्तेसाठी राजकारणात पडायचे आणि ती एकदा हस्तगत झाली की बेमुर्वतपणे वर्तन करायचे अशा प्रकारची मानसिकता …

Read More »

कर्जतचे प्रसादबुवा पाटील यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान

कर्जत : बातमीदार भजनभूषण गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कै. गजाननबुवा पाटील यांचा भजन गायनाचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वतः अनेक ओव्या …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना आवाहन

नागोठणे :  प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके बाहेर काढले आहे. शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी,  नागरिकांनी पूर्ण दक्षता घेताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे. नव्या कोरोनाविषयी जनजागृती होण्यासंदर्भात संपूर्ण शहरात दवंडीसुद्धा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी  कोरोनाच्या …

Read More »

नागोठण्यात बिबट्याचे दर्शन

नागोठणे : प्रतिनिधी अनेक दशकानंतर नागोठणे शहराच्या परिसरात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका व्यक्तीला बिबट्याचे दर्शन झाले. नागोठणे शहरात मुंबई- गोवा महामार्गालगत असणार्‍या एका हॉटेलच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे एक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने उत्सुकतेने आपल्या मोबाइलवर त्याचे चित्रणसुद्धा केले. महामार्गावरून जाणार्‍या वाहनांच्या आवाजामुळे घाबरून हा वाघ तेथून निघून गेला. ही …

Read More »

कोरोनाचे नियम पाळणार्यांनाच बल्लाळेश्वराचे दर्शन

पाली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा गडद होऊ लागले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोना संदर्भातील नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार मास्क न लावणार्‍यांना अष्टविनायक  क्षेत्रापैकी पाली (ता. सुधागड) येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेता येणार नसल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकारांना दिली.  जिल्हाधिकार्‍यांच्या …

Read More »

किल्ले रायगडावरील कामे एप्रिलअखेर पूर्ण करा

खासदार संभाजीराजेंच्या अधिकार्‍यांना सूचना महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्यावर सुरु असलेली विकास कामे येत्या एप्रिल महिन्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी (दि. 24) संबंधीत अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.  खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी रायगड किल्ल्यास भेट दिली. या वेळी त्यांनी गडावरील रोप वे …

Read More »

‘त्या’ विधानावरून क्लार्कने फिंचला सुनावले

सिडनी : वृत्तसंस्थायंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार व धडाकेबाज सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचला एकाही संघाने विकत न घेतल्याचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. फिंचवर एकाही संघाने बोली न लावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने यापूर्वी आश्चर्य व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा क्लार्कने प्रतिक्रिया दिली आहे, …

Read More »

आयपीएलचे सामने मुंबई, अहमदाबादला?

मुंबई : प्रतिनिधीगेल्या आठवड्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेनंतर आता क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आगामी आयपीएलचे. गतवर्षी कोरोनामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे 13वे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले. यंदा आयपीएलचे आगामी 14वे सत्र भारतामध्येच आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका पाहता यंदाचे सर्व सामने बीसीसीआयने मुंबई आणि अहमदाबाद येथेच खेळविण्याची तयारी …

Read More »

कळंबोली, रोहा संघ विजेते

किशोर गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पाली : प्रतिनिधीकबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या रायगडच्या मातीत सुधागड तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा दम घुमला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने झालेल्या या किशोर गट स्पर्धेत मुलींमध्ये राजमाता जिजाऊ कळंबोली आणि मुलांमध्ये जय बजरंग रोहा …

Read More »