रसायनी : रामप्रहर वृत्तछत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन नॅशनल अॅथलेटीक स्पर्धेत आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले आहे. आर्यन हा पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र असून, सध्या रसायनी येथील एचओसीएल कॉलेजमध्ये शिकत आहे.उंच उडी या क्रीडा प्रकारात आर्यन पाटील याने 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण कामगिरी …
Read More »Monthly Archives: February 2021
इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम
अहमदाबाद : वृत्तसंस्थायेथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाला. कोहलीने 27 धावांची छोटेखानी खेळी केली, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा पल्ला पार केला.इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा नवीन विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीने इंग्लंडविरोधात दोन हजार …
Read More »पृथ्वी शॉचा ‘डबल धमाका’
विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रमी द्विशतक जयपूर : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्यातील सुमार कामगिरीमुळे युवा मुंबईतर फलंदाज पृथ्वी शॉ याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता, मात्र भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वीने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे. मुंबईचे नेतृत्व करणार्या पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्धच्या लढतीत …
Read More »ठाणा नाका रस्त्याची स्वच्छता
नगरसेवक विक्रांत पाटील यांची तप्तरता पनवेल : वार्ताहर ठाणा नाका रोड येथे असलेल्या पोलीस गुन्हे शाखा युनिट 2च्या परिसरातील बरीच छोटी मोठी झाडे झुडपे वाढली होती, झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा सतत पडत असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्राला डास आणि अस्वच्छता याचा त्रास होऊ लागला होता. त्याबद्दलची अडचण काही नागरिकांनी प्रभागाचे …
Read More »नागाव ग्रामपंचायतीवर युतीचा झेंडा
सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला असून बुधवारी (दि. 24) सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी शिवसेनेचे चेतन काशिनाथ गायकवाड तर उपसरपंचपदी भाजपचे भूपेंद्र मोतीराम घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नागाव ग्रामपंचायत भाजपचे उपसरपंचपदी निवड झालेल्या …
Read More »अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्यूंजयदूत’
महामार्गावर 1 मार्चपासून राबविली जाणार योजना पनवेल : वार्ताहर महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणार्या अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता 1 मार्च 2021 रोजीपासून महामार्गाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्यूंजयदूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. …
Read More »दोन कोटी किमतीचा मांडूळ साप जप्त; खारघर पोलिसांची कारवाई
आरोपी ताब्यात पनवेल : वार्ताहर मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते असे लोकांना आमिष दाखवून त्यांना मोठ्या किंमतीत त्याची विक्री करून लोकांची फसवणूक करणार्या एका सराईत गुन्हेगारास खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. खारघर परिसरात द क्राऊन बिल्डींगजवळ एक इसम 2 कोटींचा मांडूळ साप विक्रीस घेऊन येणार असल्याची …
Read More »जेएनपीटीचे 27000 कोटींचे सामंजस्य करार
भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण उरण ः रामप्रहर वृत्त जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. 2 ते 4 मार्चदरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार्या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी (दि. 24) बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी 27000 कोटी …
Read More »खारघर हिल आदिवासीवाड्यांमध्ये विकासपर्व
पाण्याच्या टाक्या बांधण्याचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग 5मधील खारघर येथील चाफेवाडी व फणसवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आरसीसी टाक्या बांधण्याचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास महापौर …
Read More »रखडलेला भीमाशंकर मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग
रस्ते वाहतूक मंत्रालयाची तत्त्वता मान्यता नेरळ : बातमीदारभीमाशंकर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग ठरू शकेल अशा पनवेल-नेरळ-खेड-मंचर या राज्यमार्गाचे काम रखडले आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प अडगळीत टाकला असून, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक कर्जतचे …
Read More »