Breaking News

Monthly Archives: February 2021

वर्षभरात जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच

पनवेल : वार्ताहर मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून बेटी बचावसारखे अभियान राबवले जात असूनदेखील मुलांच्या मानाने मुलींची संख्या घटत असून, पनवेल महानगरपालिका हद्दीतदेखील अशीच स्थिती आहे. पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे मागील वर्षभरात जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या करण्यात आलेल्या नोंदीतील आकड्यावरून हे स्पष्ट झाले आहे. जगभरात पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या घटत असल्याने मुलींची …

Read More »

शाळांच्या हस्तांतरणास जि. प.ची मंजुरी; पनवेल मनपाच्या महासभेतही निर्णय होण्याची शक्यता

पनवेल : वार्ताहर जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणासंदर्भातील मुद्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये पालिकेत समाविष्ट होणार्‍या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या हस्तांतरणाचा मुद्दा निकालात निघणार आहे. पालिका स्थापनेपासून रखडलेला पालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता असून, येत्या महासभेत याबाबत निर्णय होण्याची …

Read More »

वॉल लिक असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी

खोपोली : प्रतिनिधी जलवाहिनीचे वॉल नादुरुस्त असल्याने खोपोली नगर परिषद हद्दीतील वासरंग रेल्वेफाटकासमोर गेले दोन दिवस हजारो लिटर पाणी वाया गेले तसेच लौजी, श्रीरामनगर, उदयविहार या भागात पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेच्या जलवाहिनीचा वासरंग फाटकाजवळील वॉल नेहमीच नादुरुस्त असतो. गेली अनेक वर्ष या वालची कायमस्वरूपी दुरुस्ती …

Read More »

वंजारवाडी येथे तलाठी कार्यालयातील कर्मचार्याला मारहाण

कर्जत पोलीस ठाण्यात वाळू माफियावर गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील वंजारवाडी येथे पेज नदीमध्ये वाळू उत्खनन सुरू असताना भालीवडी तलाठी कार्यालयातील  कर्मचार्‍याने त्याबद्दल जाब विचारला, त्यावेळी वाळू माफियाने त्या कर्मचार्‍याला मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 15)घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील भालीवडी …

Read More »

पोलादपुरातील आरोग्य यंत्रणेच्या बळींचा मुद्दा विधान परिषदेत

पोलादपूर शहरातील सैनिक नगरामधील माता मृत्यूप्रश्नी भाजपाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून जोरदार रणक्रंदन केले. आता काळवली गावातील शाळकरी मुलांचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी विधीमंडळाच्या आगामी अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. पोलादपूर तालुक्यातील दोन आरोग्य बळींसंदर्भात  आमदार …

Read More »

शिवतेज मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील शिवतेज मित्र मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षाला मंडळाच्यावतीने माघी गणेशोत्सवानिमीत्त सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. यामध्ये नवी मुंबई पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते कोरोना काळात कार्यरत असलेल्या डॉ. श्यामली कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रायगड शिव सम्राटच्या विशेषांकाचे प्रकाशन …

Read More »

भाजप महिला मोर्चातर्फे खारघरमध्ये हळदी-कुंकू

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ खारघरचा राजा गणेश मंदिर येथे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या हळदी-कुंकू समारंभाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने …

Read More »

ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वेमार्गासाठी सिडकोचा पुढाकार

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी नवी मुंबईतील दिघा येथील सर्व्हे क्र. 10, 566 चौ. मी. क्षेत्रफळाची आणि सर्व्हे क्र. 22, हिस्सा क्र. 1,2 (पी), 353 चौ. मी. क्षेत्रफळाची, अशी एकूण 919 चौ. मी. क्षेत्रफळाची जमीन देण्याचा …

Read More »

मुरूडमध्ये गाईवर चाकूने वार

फळविक्रेत्याचे कृत्य; गुन्हा दाखल मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील एका फळविक्रेत्याने त्याच्या हातगाडीवरील फळ एका गाईने खाल्याने रागाच्या भरात या गाईच्या पोटात चाकूचा वार केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) घडली. यामुळे गाय रक्तबंबाळ झाल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिक क्रोधीत होऊन त्यांनी फळविक्रेत्याला चोप देऊन राग व्यक्त केला आणि तत्काळ मुरूड पोलिसांना …

Read More »

टूलकिट म्हणजे काय रे भाऊ?

गेल्या 26 जानेवारी रोजी किसान आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीला भयानक वळण लागले. ऐन प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला. पवित्र तिरंग्याचा अपमान करण्यापर्यंत मोदीविरोधकांची मजल गेली. हे सारे उत्स्फूर्तपणे घडले नाही. त्या पाठीमागे निश्चित अशी रणनीती व कारस्थान होते हे आता दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ती …

Read More »