आरोग्यमंत्र्यांचे संकेत; आज निर्णय होण्याची शक्यता मुंबई ः प्रतिनिधीराज्यात 15 मेपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनसदृश निर्बंधांना अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सरकार लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध शिथिल करणार, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.कोरोना साथरोगाचा सर्वाधिक …
Read More »Monthly Archives: May 2021
ग्रामीण भागाची कसोटी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील काही शहरी भागांमध्ये कोरोनाचा आलेख किंचित उताराला लागल्यासारखा वाटतो आहे. रुग्णसंख्यावाढ मंदावलेली दिसत असली तरी शहर भागामध्ये मृत्यूदर मात्र अजुनही चढाच आहे. ग्रामीण भागात मात्र चिंताजनक परिस्थिती असून अनेक ठिकाणी संसर्ग वाढतो आहे. तेथील आरोग्य यंत्रणा देखील हतबल झालेल्या दिसून येत आहेत. मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाची साथ …
Read More »कृपया सुरक्षित राहा, ही वेळ निघून जाईल!; इंग्लंडच्या पीटरसनचे भारतीयांना आवाहन
इंग्लंड ः वृत्तसंस्था कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात चिंतेची परिस्थिती निर्माण केली आहे. या विषाणूने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा 14वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर या स्पर्धेत खेळणारे खेळाडू आणि इतर सदस्य त्यांच्या मायदेशी परतले आहे, मात्र घरी जाऊनही काही खेळाडूंनी भारताच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत धीर दिला आहे. आयपीएलमध्ये …
Read More »कोहलीने घेतली कोरोनाची लस
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड दौर्यापूर्वी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. त्याने लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहनही विराटने केले आहे. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पत्नीसह कोरोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक …
Read More »सनरायझर्स हैदराबाद संघाकडून कोरोनाविरुद्ध लढ्यात मोठे योगदान; 30 कोटींची मदत
हैदराबाद ः वृत्तसंस्था आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी कोरोनाच्या दुसर्या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी 30 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. सन टीव्ही हे हैदराबाद संघाचे मालक असून, त्यांनी केलेली मदत सनरायझर्स हैदराबादने ट्विटरवर पोस्ट केली आहे. आतापर्यंत देणग्यांमधील ही सर्वांत मोठी देणगी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा 14वा हंगाम स्थगित करण्यात आला. …
Read More »आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यांतून इंग्लिश खेळाडू ‘आऊट’
लंडन ः वृत्तसंस्था कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14वा हंगाम पुढे ढकलला. बीसीसीआय या लीगच्या उर्वरित सामन्यांबाबत आशादायी आहे, मात्र उर्वरित सामन्यांत इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाहीत, असे इंग्लंड क्रिकेटचे संचालक एश्ले जाइल्स यांनी म्हटले आहे. जाइल्स म्हणाले, आम्ही इंग्लंडच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना सहभागी करण्याचा विचार …
Read More »श्रीलंका दौर्यासाठी द्रविड प्रशिक्षक?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यामध्ये श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. श्रीलंकेचा हा दौरा भारतीय संघासाठी खास ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड या दौर्यामध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान जुलै महिन्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 …
Read More »ज्येष्ठांचे गृहविलगीकरण कमी
महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आता थोडासा का होईना दिलासा मिळत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आता गृहविलगीकरणाचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. सद्य:स्थितीमध्ये 1,424 जण घरी उपचार घेत असून, त्यामध्ये पन्नाशीच्या पुढील 337 जणांचा समावेश आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी 50 वर्षांवरील रुग्णांनी …
Read More »उरण पिरवाड समुद्रकिनारा सुना सुना
उरण : वार्ताहर कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन तसेच काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात समुद्रकिनार्यांवर फिरण्यास मनाई असल्याने पर्यटकांविना उरण पिरवाड समुद्रकिनाराही ओस पडला आहे. येथे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. समुद्रकिनार्यावर असलेल्या खाद्यपदार्थांच्या टपर्या, दुकाने, हातगाडीवाले, कणीसवाले, चायनीज, मांसाहार, भाकरी, शहाळे आदी दुकाने बंद असल्याने …
Read More »पनवेलमध्ये वेगवेगळ्या अपघातांत चौघे जखमी
पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण जखमी झाले आहेत. या वेळी घडलेल्या अपघातांत वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती हॉटेलसमोर पनवेल बाजूकडे जाणार्या रोडवर एका भरधाव टँकरने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील अजित हवालदार (26, रा. दिव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper