Breaking News

Monthly Archives: June 2021

वेळोवेळी आंदोलने करूनही प्रकल्पग्रस्तांची परवड सुरूच!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…गेली अनेक वर्षे जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनीचा अनिर्णीत राहिलेला प्रश्न होता, तो सोडविण्याच्या …

Read More »

नागरिकांचा मुक्तसंचार वाढल्याने रुग्णवाढ; कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण, नवी मुंबईत आठवडाभरात 658 नवे पॉझिटिव्ह

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले आहे. कोरोनाचा संसर्ग काही काळ घटतो आणि पुन्हा वाढतो. यामध्ये नियमांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे असतानाही कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर नागरिकांचा मुक्तसंचार सुरू झाला आहे आणि हा मुक्तसंचार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रण देईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात …

Read More »

‘निपाह व्हायरस’चा महाराष्ट्रात शिरकाव

महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले विषाणू महाबळेश्वर ः वृत्तसंस्थाकोरोना संकटाशी सामना करणार्‍या महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. एका वृत्तानुसार, मार्च 2020मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ आढळले होते.जागतिक आरोग्य संघटनेने …

Read More »

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे

प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न, लक्षवेधी वगळले; विरोधकांची टीका मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कमीत 15 दिवसांचे तरी घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने केलेली असताना राज्य सरकारने मात्र केवळ दोन दिवसांत अधिवेशन उरकण्याचा निर्णय घेतला आहे. 5 व …

Read More »

‘दिबां’च्या नावाला वाढता पाठिंबा

विमानतळ नामकरणासंदर्भात सर्व स्तरांतून समर्थन पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी पनवेल येथे …

Read More »

धोनीचा नवा मिशीवाला लूक

शिमला ः वृत्तसंस्थाभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण या वेळी क्रिकेटसाठी नव्हे, तर त्याच्या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.धोनीने ऑगस्ट 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. त्यानंतर तो बहुतेक वेळा शेतात किंवा कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करताना दिसला. धोनी सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत …

Read More »

विंडीजविरुद्ध केशव महाराजची हॅट्ट्रिक

सेंट लुसिया ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट लुसिया येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हॅट्ट्रिक नोंदवत धमाल उडवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला. तब्बल 61 वर्षांनी आफ्रिकेच्या खेळाडूने हॅट्ट्रिक घेतली आहे. यापूर्वी जेफ …

Read More »

गोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा ः वृत्तसंस्थाभारताचा गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूर इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. याचप्रमाणे 4 बाय 100 मीटर रिलेमधील भारताच्या ‘अ’ महिला संघाने आणि द्युती चंदने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.ताजिंदरने 21.49 मीटर अंतरावर गोळा फेकून ऑलिम्पिक पात्रतेच्या (21.10 मीटर) निकषांची पूर्तता …

Read More »

नेदरलँड्स, ऑस्ट्रिया बाद फेरीत

अ‍ॅमस्टरडॅम, बुचारेस्ट ः वृत्तसंस्थानेदरलँड्स आणि ऑस्ट्रिया यांनी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत थाटात प्रवेश केला. जॉर्जिनियो विजनाल्डम याने साकारलेल्या दोन गोलमुळे नेदरलँड्सने उत्तर मॅसेडोनियाचा 3-0 असा पराभव करीत क गटात अग्रस्थान पटकावले. दुसरीकडे ऑस्ट्रियाने बलाढ्य युक्रेनचे आव्हान 1-0 असे परतवून लावले.उत्तर …

Read More »

कीर्तन आणि तमाशा

वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी अवस्था महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे. वरकरणी सारे काही आलबेल असल्याचे दिलासे देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वारंवार टीव्ही कॅमेर्‍यांसमोर येत असतात. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल अशी दर्पोक्ती करत असतात. सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्ष एकमेकांशी उत्तम समन्वय असल्याचा देखावा करत असले तरी …

Read More »