Breaking News

Monthly Archives: June 2021

पेणमध्ये 108 सूर्यनमस्कारांचा योग दिन विशेष

पेण : प्रतिनिधी योगाचे महत्त्व फक्त वजन कमी करण्यासाठी नसून निरोगी जीवन जगण्यासाठी जास्त आहे. म्हणूनच निसर्ग हास्य क्लबचे रूपांतर ऑनलाइन योगामध्ये करुन कोविडच्या महामारीत समस्त योगाप्रेमींना एक संधी उपलब्ध करून दिली असल्याचे योग गुरू हेमंत गवाणकर यांनी सोमवारी (दि. 21) सांगितले. जागतिक योग दिना निमित्ताने सोमवारी सकाळी घेतलेल्या ऑनलाइन …

Read More »

शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप; भाजप किसान मोर्चाच्या दणक्याने खालापूर सोसायटी वठणीवर

कडाव, खालापूर : प्रतिनिधी खालापूर विविध विकास सहकारी सोसायटीकडून अनेक शेतकर्‍यांना पीक कर्ज नाकारण्यात येत होते. त्याबाबत भाजपचे किसान मोर्चा कोकण विभाग संघटक सुनील गोगटे यांनी थेट सोसायटीच्या कार्यालयात जावून तेथील अधिकार्‍यांना जाब विचारला होता. त्या वेळी सोसायटीचे सचिव अजय भारती यांनी 20 जूनपर्यत पीक कर्ज वाटप करण्याचे मान्य केले …

Read More »

माथेरानमध्ये पावसाचे धूमशान; 21 दिवसांत ओलांडला 1100 मिलिमीटरचा टप्पा

कर्जत : बातमीदार पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. 1 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने गेल्या 21 दिवसांत 1100 मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. माथेरानला सरासरी 3050 इतका पाऊस पडतो. या वेळी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा वेग मंदावला होता. 12 जूनपर्यंत जेमतेम 500 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, …

Read More »

अरुणराव दाते : सामाजिक कार्याला वाहून घेतलेले संघ कार्यकर्ते

रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुण माधव दाते यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि क्रियाशीलता आजही त्यांच्या ठिकाणी ओसंडून वाहत …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर

सध्याची नेरळ ग्रामपंचायतमधील राजकीय स्थिती पाहता शिवसेनेकडे सात, तर भाजप-राष्ट्रवादी-शेकाप यांच्याकडे स्वतःचे नऊ आणि सेनेला रामराम करून आरपीआयमध्ये प्रवेश केलेले एक तसेच सेनेच्या नेरळ ग्रामपंचायतमधील सदस्यांच्या गोटात घेतला जात नसलेला एक सदस्य असे 11 सदस्य आज सत्ताधारी गटाकडे आहेत. सेनेकडे हक्काचे सात सदस्य असून नजीकच्या काळात नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक …

Read More »

शरणागतीचे रहस्य

बारा-तेरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा बंद दाराआड या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतरच महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या. पाठोपाठ महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी बैठक झाली, पण सरकार गेंड्याच्या कातडीचे निघाले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 16 जानेवारी 1997 रोजी हुतात्मा दिनी जेव्हा आत्मदहनाची …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहणार!

24 जूनचे आंदोलन न भुतो न भविष्यती होणार; कृती समितीचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुसर्‍या फेरीतील चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि त्यांच्या …

Read More »

कर्जत-माथेरान मिनीबस पुन्हा सुरू

भाजपच्या मागणीला यश कर्जत ः बातमीदारयंदा कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर बंद करण्यात आलेली कर्जत-माथेरान मिनीबस सेवा तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्याचा निर्णय कर्जत एसटी आगाराने घेतला आहे. यासाठी स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने मागणी केली होती. त्यानुसार सोमवार (दि. 21)पासून ही बससेवा सुरू झाली आहे.माथेरानमधील सर्वसामान्य जनतेकडे वाहन …

Read More »

जागतिक योग दिन उत्साहात साजरा

सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन सोमवारी (दि. 21) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Read More »