Breaking News

Monthly Archives: June 2021

ठाकरे कुटुंबीयांचा मालमत्ता घोटाळा उघड करणार -किरीट सोमय्या

मुरूड ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत केलेला मालमत्ता घोटाळा लवकरच जनतेसमोर आणू, असे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. ते सोमवारी (दि. 7) मुरूड तहसील कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते.या वेळी सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश …

Read More »

देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे होणार मोफत लसीकरण

केंद्र सरकारने उचचली जबाबदारीपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 7) देशवासीयांशी संवाद साधताना लसीकरणासंदर्भात ही मोठी घोषणा केली.देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने कोविड योद्धे आणि 45 वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचा मुंबईतही एल्गार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन …

Read More »

मोदी हेच खरे औषध!

सौ सुनार की और एक लोहार की.. या हिंदी म्हणीचे प्रत्यंतर भारतीय जनतेला सोमवारी सायंकाळी आले असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांसाठी केंद्र सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी अभूतपूर्व घोषणा करून सर्व विरोधकांची तोंडे कायमची बंद केली आहेत. इतकेच नव्हे तर, गरीब कल्याण योजनेअंतर्गत भारतातील …

Read More »

आगरकोट किल्ला प्रवेशद्वाराची पडझड

तिठ्यावरील शिल्पही ढासळले रेवदंडा : प्रतिनिधी येथील आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला तिठा असे संबोधले जाते. या ऐतिहासीक किल्ल्याच्या मोठ्या बंदराकडील प्रवेशद्वाराची पडझड झाली असून, तिठ्यावरील शिल्प (बोधचिन्ह) तुटून खाली पडले आहे. आगरकोट किल्ला रेवदंडा व कोर्लई जवळील समुद्रात आहे. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात पोर्तुगीजांनी शिल्प कोरले होते. ते इतिहासप्रेमी …

Read More »

पाच पिढ्यांनंतरही आमच्याकडं रस्ता नायं!

खांदाड आदिवासीवाडीतील बांधवांनी मांडली व्यथा माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील मोर्बारोडवरील खांदाड आदिवासीवाडी विकासकामांपासून वंचित असून, वाडीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना विशेषतः पावसाळ्यात फार त्रास सहन करावा लागतो. पाच पिढ्यानंतरही आमच्याकडं रस्ता नायं, अशी व्यथा येथील आदिवासी बांधवांनी प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केली. माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड आदिवासीवाडीत 25 …

Read More »

माथेरानचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण कर्जत : बातमीदार महावितरणच्या नेरळ सबस्टेशनमध्ये एक्स्प्रेस फिडरचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा योजनेतील पंपिंग स्टेशनला अखंडित वीजपुरवठा होऊन माथेरानला सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. माथेरानला पाणीपुरवठा करण्यासाठी उल्हास नदीकाठी कुंभे येथे व जुम्मापट्टी तसेच वॉटर पाइप येथे पंपिंग स्टेशन आहेत. यापैकी कुठल्याही ठिकाणी …

Read More »

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध

आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालयाला आमदार निधीतून वैद्यकीय साहित्याची भेट पेण : प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा आणि उपचार मिळावेत यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले. रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण उपजिल्हा रुग्णालयाला पाच लाख 92 हजार रुपयांचे वैद्यकीय …

Read More »

अ‍ॅपकॉटेक्स कंपनीच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना काळात सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना बर्‍याच कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवलेली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना नोकर्‍यादेखील गमवाव्या लागल्या, असे असताना दुसरीकडे तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या अ‍ॅपकॉटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना भरघोस अशी 14 हजार रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतलेला आहे. …

Read More »

पोलिसांकडून आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर स्माईल फाऊंडेशन व ब्लू लाईन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण, पो. आजिवली, ता. पनवेल) ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारीमध्ये …

Read More »