Breaking News

Monthly Archives: September 2021

विविध मागण्यांसंदर्भात बीएमएसचे शासनाला निवेदन

मुंबई : रामप्रहर वृत्त संघटित व असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांच्या विविध प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस)वतीने बुधवारी (दि. 8) देशभर प्रत्येक राज्यात, सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कायालर्यावर धरणा, मोर्चा व निदर्शनांद्वारे कामगारांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करण्यात आले. त्यानुसार बीएमएस, रायगडच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच …

Read More »

रोह्यात नवजात बालक जखमी अवस्थेत आढळले

रोहा, धाटाव ः प्रतिनिधी दोन-तीन दिवसांच्या नवजात मुलाला निर्जनस्थळी झुडपात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 7) सायंकाळी रोह्यात कब्रस्तान परिसरात समोर आली. कब्रस्तानमागे कावळ्यांची गर्दी का झालीय हे पाहण्यासाठी ताबिश लद्द हा युवक गेला असता त्याला अर्भक दिसून आले. त्याने लगेच झुडपे बाजूला करून प्रथम बालकाला सुरक्षित केले. …

Read More »

एकल महिलांना धान्याचे किट वाटप

पनवेल महापालिका व सिप्ला कंपनीचा उपक्रम पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका आणि सिप्ला कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरोनामध्ये ज्या महिलांनी आपले पती गमावले अशा 200 एकल महिलांना बुधवारी (दि. 8) जीवनाश्यक धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेविका …

Read More »

मुरूडमधील सर्व पुलांचे मजबुतीकरण करा

अ‍ॅड. महेश मोहिते यांची मागणी मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पूल हे कमकुवत झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांनी प्रथम मुरूड तालुक्यातील सर्व पुलांचे मजबुतीकरण करावे, अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिला. …

Read More »

संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केली सडकून टीका मुंबई : प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेले पत्र आपल्याला मान्य नाही, असे म्हणत संभाजीराजे यांनी पत्रातील मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते.मुंबईत बुधवारी (दि. 8) घेतलेल्या …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून चित्रकार केविन डायसचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील चित्रकार केविन डायस याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचे सुवर्णपदक स्वीकारत असलेल्या क्षणाचे हुबेहूब चित्र साकारले. या चित्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल महापालिका सभागृह नेते परेश …

Read More »

कळंबोली विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रम

कळंबोली : बातमीदार सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करून संघटनेला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. तर वृक्षलागवड, गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित …

Read More »

नवी मुंबईत ‘ओल्ड एज होम’चे बांधकाम प्रगतिपथावर

आमदार मंदा म्हात्रे यांनी केली पाहणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर 38 येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणार्‍या ओल्ड एज होमच्या बांधकामाची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी (दि. 8) पाहणी दौरा केला. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, युवा …

Read More »

पनवेल परिसरात फसवणुकीच्या घटनांत वाढ

\ पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकाराद्वारे नागरिकांची फसवणुक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात वाढल्या आहेत. कोरोना, लॉकडाऊन आणि जीवनमानासह प्रत्येकाच्या मानसिकतेवर झालेला परिणाम याबाबींमुळे व्यक्ती फसवणुकीचा शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कोरोना काळात झालेली आर्थिक हानी यामुळे तरुणपीढी झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने …

Read More »

मंगळागौर स्पर्धा रंगली; महिलांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी खांदा कॉलनी विभागातील विविध पदांवर  नियुक्त करण्यात आलेल्या महिलांना नियुक्तीपत्र …

Read More »