1800 गणेशभक्तांना घेऊन मोदी एक्स्प्रेस रवाना मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या 1800 चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्स्प्रेस मंगळवारी (दि. 7) मुंबईहून सावंतवाडीकडे रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल …
Read More »Monthly Archives: September 2021
मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांची सदिच्छा भेट
पनवेल ः मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाऊनचे अध्यक्ष विजय रायमाने, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे उपस्थित होते.
Read More »माथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळासाठी परवानगी द्यावी
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तमाथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळास परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी (दि. 7) दिल्ली येथे केली. या संदर्भात मंत्री …
Read More »कोकणासह राज्यात जोर‘धार’
रायगडला रेड अलर्ट मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने महाराष्ट्राला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्यानुसार कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत पाणी साचले. जोरदार पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भात बसला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे.कोकणात पावसाचा जोर रत्नागिरीतील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये अधिक आहे. …
Read More »जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अलिबागचा सचिन पाटील भारतीय संघात
अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय शरीरसौष्ठव विश्व आता आगामी 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. कोरोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतील …
Read More »पॅरालिम्पिकपटूंचे जल्लोषात स्वागत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर नेमबाज अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांच्यासह भारतीय खेळाडूंची अखेरची तुकडी सोमवारी मायदेशी परतली. त्यांचे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांत विक्रमी कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह एकूण 19 पदकांची कमाई केली.टोकियो …
Read More »टीम इंडिया सुसाऽऽट!
ऐतिहासिक विजयानंतर ‘डब्ल्यूटीसी’मध्ये अग्रस्थानी दुबई : वृत्तसंस्थाभारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले आहे. विराटसेनेकडे आता पहिल्या क्रमांकाची खुर्ची आहे. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 157 धावांनी जिंकला. या संस्मरणीय विजयाच्या आधारावर भारताला 26 गुण आणि 54.17 अशी टक्केवारी मिळाली. यामुळे …
Read More »जिल्ह्यात एक लाख 76 हजार लसीचा पुरवठा
आरोग्य प्रशासनाकडून पहिल्यांदाच 35 ग्रामपंचायतींना लसीचा पुरवठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) एक लाख 76 हजार लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील 35 लसीकरण मान्य ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच प्रत्येकी 200 लसीचा पुरवठा आरोग्य विभागाकडून केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य …
Read More »गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड पोलीस सज्ज
महामार्गावर 13 ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय या महामार्गावर 13 ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महामार्गावर रायगडच्या हद्दीत गणेश भक्तांच्या मदतीसाठी …
Read More »बोर्ली परिसरात अतिवृष्टी
बाजारपेठ पाण्याखाली; साळाव चेकपोस्टजवळ दरड कोसळली रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील येसदे, साळाव, सुरई परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बोर्ली बाजारपेठ पाण्याखाली गेली, त्यात व्यापार्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली, तर येसदे ते शिरगाव या मुख्य रस्त्यावर पाणी व मातीचा चिखल झाला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper