Breaking News

Monthly Archives: November 2021

पाकच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत

नवी मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील जलपरी या मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे हा तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना गुरुवारी (दि. 11) कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील …

Read More »

खारघरच्या डोंगरावर वणवा; मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक

खारघर : प्रतिनिधी तळोजा कारागृहाशेजारी असलेल्या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत शेकडो रोपटी जळून खाक झाली आहेत. खारघर सेक्टर 35 तळोजा कारागृहालगत असलेल्या डोंगरावर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून संगोपन करण्याचे काम करीत आहे. डोंगरावरील झाडांची हानी होवू नये म्हणून खारघर मधील पर्यावरण …

Read More »

उरणच्या पाणथळ क्षेत्रात आगी लावण्याचे प्रकार?

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे येथील समुद्र किनार्‍यांचे काही समाज कंटकांनी पाणथळी जवळील व फ्लेमिंगा पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या गवताळ आणि झाडा-झुडपांना आग लावून येथील पक्ष्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील जैवविविधता आणि पक्ष्यांचे निवास धोक्यात आले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी या येथील गवताला आणि झाडा झुडपांना आग लावण्याचा …

Read More »

मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ

नवी मुंबईत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ झालेली दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ताप थंडीची लक्षणे असलेले रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत मलेरियाचे 40 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी फक्त 26 रुग्ण होते. यामुळे …

Read More »

शेवटाकडे वाटचाल?

डेल्टा प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रचंड वेगाने होणारा फैलाव, जगाच्या काही भागांमध्ये लोकांची लसीकरणाविषयीची उदासीनता आणि सध्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमार्फत मिळणारे अर्धवट कोरोना संरक्षण या सार्‍यांमुळे कोरोनाशून्य जग इतक्यात काही प्रत्यक्षात येणार नाही. तज्ज्ञांच्या मते, या महासाथीचा शेवट म्हणजे इतर अनेक साथरोगांप्रमाणेच आपण या साथरोगावरही प्रभावी नियंत्रण मिळवणे. म्हणजे कोरोना अस्तित्वात असेल, …

Read More »

पनवेल महानगरपालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार पुरस्कार

पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार   जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ अमृत महोत्सवात नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सव शनिवारी (दि. 20 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला …

Read More »

पेण अर्बन व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही तख्त हलवू

आमदार महेश बालदी यांची गर्जना मोहोपाडा : रामप्रहर वृत्तपेण अर्बन बँक व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही प्रसंगी तख्त हलवू, असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले. ते मोहोपाडा येथील पाटील हॉलमध्ये गुरुवारी (दि. 11) रसायनी विभाग आयोजित दीपावली व नूतन वर्षाच्या स्नेह मीलन समारंभात उपस्थित …

Read More »

भाजप किसान मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम

कर्जत : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कर्जत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 11) झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या.भाजप किसान मोर्चाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम, …

Read More »

नवाब मलिक यांना ईडीचा दणका

वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणार्‍या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. मंत्री नवाब मलिक यांना हा मोठा झटका मानला जात आहे. …

Read More »

महाविकास आघाडी हे मनमानी आघाडी सरकार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा ट्वीटद्वारे हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्तएसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारची भूमिका राज्याला भूषणावह नाही. या सरकारने फक्त स्वार्थी आणि निष्क्रिय कारभार केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांसह प्रवाशांचे नाहक हाल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू ठेवत आपली मनमानी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी हे मनमानी आघाडी …

Read More »