पतियाळा ः वृत्तसंस्थाहरयाणाचा क्रिशन कुमार आणि पंजाबची हरमिलन बेन्स यांनी चमकदार कामगिरी करीत राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.क्रिशनला उत्तराखंडच्या अनू कुमारने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला, पण क्रिशनने आपला वेग …
Read More »Yearly Archives: 2021
दीपिकाची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक
पॅरिस ः वृत्तसंस्थादीपिका कुमारीने सातत्यपूर्ण कामगिरी करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत एकाच दिवशी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली.दीपिकाने महिला एकेरीच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत रशियाच्या एलेना ओसिपोव्हा हिच्यावर 6-0 अशी हुकूमत गाजवली. तिने मिश्र आणि महिला सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. मिश्र प्रकाराच्या अंतिम फेरीत दीपिकाने आपला पती अतनू दास याच्या साथीने पिछाडीवरून …
Read More »पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात
युरो कपमध्ये बेल्जियमकडून पराभव सेव्हिल ः वृत्तसंस्थाबेल्जियमने माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाला अनेपेक्षित धक्का देत युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून बाहेर केले आहे. करो या मरोच्या बाद फेरीतील सामन्यामध्ये बेल्जियमने पोर्तुगालवर 1-0 ने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बेल्जियमच्या थोरगन हाझार्डने पहिल्या हाफमध्ये लगावलेला एकमेव गोल हा निर्णायक ठरला. बेल्जियम …
Read More »सुधागडात 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू
पाली : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसर्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आल्याने चिंतेत भर पडली. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरणावर भर दिला जातोय. सुधागडातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 44 वयोगटासाठी शनिवार (दि. 26) पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार 18 ते …
Read More »आदिवासी बालकाची भट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलिसांच्या तत्परतेमुळे रोहा तालुक्यातील चिंचवली खोंडावाडी येथील आदिवासी कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलाची नांदेड येथील कोळसाभट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका झाली. हा मुलगा दीड महिन्यानंतर आपल्या घरी आला आहे. चिंचवली खोंडावाडी येथील सुनील अप्पा जाधव, राहुल सुनील जाधव (वय 6), गुलाब वसंत पवार, वसंत पवार, संतोष भास्कर पवार …
Read More »पुनाडे धरण परिसर झाला चकाचक!
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा झाल्याने हा परिसर विद्रुप दिसत होता. हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, कोप्रोली यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 27) पुनाडे धरण …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात योग दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पतंजली योगपीठ पनवेल शाखेतील योग शिक्षकांनी उपस्थित प्राध्यापक व कर्मचार्यांना प्रात्यशिकासह मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीने योग ही जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. त्याचा फायदा सर्वांनी …
Read More »गाढी नदी परिसरात वृक्षारोपण; वकील महिलांचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वकील महिला एकत्र येऊन त्यांनी पनवेलमधील गाढी नदी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला होता. सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा सर्वांना परिचय करून दिला. महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण …
Read More »तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी उरणमध्ये सज्जता
शहरासह तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जनजागृती उरण : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाच्या आकडेवारीनुसार पुढील काही आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषय नागरिकांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी उरण येथील तहसील कार्यालय, उरण पंचायत समिती, डीओएचसी तसेच उरण मेडीकल असोसिएशन यांचेमार्फत जनजागृती …
Read More »ओबीसींसाठी रस्त्यावर उतरणार : विजय वडेट्टीवार
पुणे ः प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. ओबीसींसाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे राज्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. ओबीसी मंत्रालयाला स्टाफ नसणे, निधीची तरतूद नसणे चिंताजनक असून अजित पवार व धनंजय मुंडेंकडे याबाबत वारंवार विचारणा करावी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper