Breaking News

Yearly Archives: 2021

‘टीआयपीएल’तर्फे पोलिसांना रेनकोट वाटप

पनवेल : ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (टीआयपीएल)च्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

कोरोना लसीकरणात भारत अव्वल

अमेरिकेला टाकले मागे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असून सोमवार (दि. 28)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसींचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक …

Read More »

शिवसेनेत पुन्हा ‘लेटरबॉम्ब’

काँग्रेस आमदाराविरोधात शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पुणे ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून वेगळे होत भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर  आरोप करीत …

Read More »

शक्तिवर्धकाचा दुसरा डोस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आणखी एका भरीव आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसर्‍या आर्थिक पॅकेजनंतर विरोधक मात्र गडबडून गेलेले दिसले. जाहीर झालेल्या या ताज्या आर्थिक सवलती अपुर्‍या कशा आहेत याबद्दल नेहमीप्रमाणे ओरड होईलही, परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार केल्यास नवे आर्थिक पॅकेज शक्तिवर्धकाच्या मात्रेप्रमाणे काम …

Read More »

मोदी सरकारकडून 6.29 लाख कोटींचे पॅकेज जाहीर

कोरोना संकटात विविध क्षेत्रांना पाठबळ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटातून देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मोदी सरकारकडून सोमवारी (दि. 28) पुन्हा सहा लाख 29 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यामध्ये आरोग्य विभागासाठी 50 हजार कोटी, तर इतर क्षेत्रांसाठी 60 हजार कोटींची तरतूद असल्याची घोषणा …

Read More »

पावसाळी अधिवेशनासाठी ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनात होणार असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरिता कोविड-19 संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दोन्ही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि …

Read More »

कोरोनाचे नियम मोडल्याने माणगावात चार दुकाने सील

माणगाव : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माणगाव नगरपंचायतीने शहरातील चार दुकानांना टाळे ठोकले असून काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. माणगाव शहर तसेच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ती आटोक्यात आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अनेक नागरिक व व्यापारी कोरोनाविषयक नियमांचे राजरोस उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस व …

Read More »

माथेरान पर्यटकांनी गजबजले; व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये उत्साह

माथेरान : रामप्रहर वृत्त बंदी उठताच माथेरानमध्ये रविवारी (दि. 27) पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांत उत्साह संचारला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातल्याने माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे येथील नागरिक व व्यावसायिक अडचणीत आले होते. पर्यटकांसाठी माथेरान खुले करावे, अशी मागणी भाजपतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली …

Read More »

किल्ले रायगडाला हवे आधुनिक पद्धतीचे संरक्षण

कोकणामध्ये दरवर्षी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होतो. अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यामध्ये जीवितहानीप्रमाणे वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात होते. या विजेमुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंचेदेखील नुकसान होत असल्याने किल्ले रायगडासह कोकणामध्ये असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तूंचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी …

Read More »

धावपटू प्रियांशी भोईरचा सत्कार

पाली ः प्रतिनिधीपेण तालुक्यातील मुंढाणी येथील प्रियांशी विजय भोईर हिने आपल्या सहाव्या वाढदिवसानिमित्त नागोठणे ते शिहू असे 10 किलोमीटर अंतर भरपावसात धावून केवळ 50 मिनिटांत पूर्ण केले. याबद्दल बेणसे येथील सम्यक कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रियांशीचा सत्कार करण्यात आला.या वेळी प्रमुख …

Read More »