Breaking News

Yearly Archives: 2021

विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन टेस्ट; सुधागडात आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात विनाकारण व विनामास्क फिरणार्‍यांची 63 जणांची सोमवारी (दि. 7) पाली, परळी व उन्हेरे फाट्यावर तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण थळे, …

Read More »

रायगडात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा; दरडग्रस्त गावांमधील लोकांचे होणार स्थलांतर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दोन दिवस (दि. 10 व 11) अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरील 62 गावे, खाडीकिनार्‍यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 दरडग्रस्त गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. मुबईसह उत्तर कोकणमध्ये 10 व 11 जून रोजी अतिवृष्टी …

Read More »

नियोजित डोलवी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना रोखले

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) डोलवी औद्योगिक वसाहत विकसित करीत आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांनी भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसी …

Read More »

पनवेल मनपातर्फे महिलांना शिष्यवृत्ती; 17 जणींना लाभ

पनवेल : प्रतिनिधी येथील महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मनपा क्षेत्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना तसेच क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या महिला खेळाडूंना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्तीचे वाटप महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले. …

Read More »

लोकसेवेचं संचित म्हणजे दि. बा. पाटील

प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल नवी मुंबई हे नाव डोळ्यापुढे आल्यावर टोलेजंग इमारती, नियोजनबद्ध रस्ते डोळ्यापुढे येतात. संपत्ती आणि सुबत्तेच्या या डोळे दिपवणार्‍या महानगरीच्या निर्मितीसाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केलेला त्याग क्वचितच सर्वांच्या लक्षात असेल. 21व्या शतकाच्या प्रारंभी सिडकोने उभारलेले नवी मुंबई शहर भव्य जरूर आहे, मात्र या शहराखालच्या जमिनीच्या …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने शास्त्रशुद्ध-लयबद्ध सूर्यनमस्कार स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी मर्यादित आहे.आठ गटांमध्ये होणार्‍या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास 5555 रुपये, द्वितीय 3333 हजार रुपये, तृतीय 2222 रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 1111 रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह अशी …

Read More »

किल्ले रायगडावर तरुणांचा धुडगूस

महाड ः प्रतिनिधीकिल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद असतानाही काही तरुणांनी जबरदस्ती महादरवाजा उघडून गडावर प्रवेश केला, तसेच त्यांना अटकाव करणार्‍या पुरातत्व विभागाच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाड पोलिसांनी मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून तरुणांना सोडून दिले.संपूर्ण महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेला किल्ले रायगड हे तमाम मराठी माणसांचे श्रद्धास्थानही आहे. याच …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याच्या मागणीसाठी 10 जूनला

अलिबाग येथे मानवी साखळी अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 10 जून रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते चरी अशी 10 किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत संतापले

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ठाकरेंनी माहिती दिली. या वेळी एका प्रश्नावरून ते संतापल्याचे दिसून आले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान …

Read More »

पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर उरणमधील सेव अवर बीच, उरण शटलर्स ग्रुप, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील पीरवाडी समुद्रकिनारी रविवारी (दि. 6) सकाळी 7 ते 11 या वेळेत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून युवकांचा यात खूप मोठा सहभाग …

Read More »