नवी मुंबई : प्रतिनिधी निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाने पाच जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्गाने आधीच कंबरडे मोडले आहे. जर वादळाने बाधित झालेल्या मच्छीमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाही तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला आपण योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश …
Read More »Yearly Archives: 2021
जीवनावश्यक वस्तूंचे विविध ठिकाणी आजही होणार वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 27) तालुक्यातील भेरले, शेडुंग, भिंगारवाडी, न्हावा खाडी, शिवाजीनगर, न्हावा, माळडुंगे, खैरवाडी, बॉडारपाडा, फणसवाडी, गारमाळ, कोंडले, नांदगाव, भंगारपाडा आदी गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी …
Read More »लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लसींची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का?, असा …
Read More »मुंबई मनपाचे ‘ते’ ग्लोबल टेंडर बनावट; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसी उपलब्ध नसल्याच्या या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर …
Read More »पदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीत बिघाडी?
सत्ता प्रिय नसल्याचा काँग्रेसचा सूचक इशारा मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या आदेशावरून नवनवीन वाद निर्माण होत आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा देत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत संविधान नियमानुसार कामकाज महत्त्वाचे आहे. आम्हाला सत्ता प्रिय नाही, असे विधान करीत …
Read More »पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात
पेण : प्रतिनिधी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती बुधवारी (दि. 26) पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारी …
Read More »लसीकरणासाठी मुरूडमध्ये मोबाइल व्हॅन दाखल
रेशन दुकानदार यांनी घेतला लाभ मुरुड : प्रतिनिधी शासनाच्या योजना तसेच थेट जनतेशी संपर्क येणार्या यंत्रणांतील लोकांचे लसीकरण करण्यासाठी सर्व सुविधायुक्त मोबाइल व्हॅन बुधवारी (दि. 26) मुरूडमध्ये दाखल झाली असून, तहसीलदार गमन गावीत यांच्या उपस्थितीत या व्हॅनमध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मुरूड तालुक्यातील रेशन दुकानदार, शिवभोजन केंद्र, गोदामातील हमाल, वाहन …
Read More »अलिबागेतील वादळग्रस्तांना भाजपकडून पत्रेवाटप
अलिबाग : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडाले. अलिबाग तालुक्यातील वादळग्रस्तांना आता भाजपाने मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपच्या माध्यमातून तालुक्यातील वादळग्रस्तांना छताच्या पत्र्यांचे वाटप करण्यात आले. अलिबाग शहराबरोबरच लगतच्या वरसोली कोळीवाडा , रोहिदास नगर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे वक्रीवादळात उडून गेले होते. त्यांना …
Read More »पेणमधील खारभूमी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे
उधाणाच्या पाण्याने नारवेल ते बेनवले बंधारा वाहून जाण्याची भिती पेण : प्रतिनिधी जागतिक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल ते बेनवले या 17 किमी लांबीच्या बंधार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात उधाणाच्या पाण्याने हा बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. …
Read More »खालापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची थाळी रिकामी
पाच महिन्यांपासून मोबदला नाही खोपोली : प्रतिनिधी कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणारी शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे. खालापूर तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper