अलिबाग ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाच्या दणक्याने रायगडात फळबाग, शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांना आवश्यक ते सामान खरेदी करता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तूंची व हार्डवेअर दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास रायगड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने …
Read More »Yearly Archives: 2021
कोरोना 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट : मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20) कोरोनासंदर्भात देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 54 जिल्हाधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. कोरोनाची साथ गेल्या 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोनाने आव्हाने आणखी वाढवलीत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वांत मोठे योद्धे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अॅपेक्स हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. पनवेलच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उलवे नोड येथे सेवाभावी डॉक्टरांनी अॅपेक्स हॉस्पिटल हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.उलवे …
Read More »सोनू सूदकडून कर्ण शर्माचे कौतुक
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने भरघोस मदत केली. सोनूला या वेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू कर्ण शर्माही मदत करीत असल्याचे समोर आले आहे. सोनूने याबद्दल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडू कर्ण शर्माचे कौतुक करून कोरोनाच्या कठीण काळात हा खेळाडू मोठे काम करीत …
Read More »पनवेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळा उभारणीला महासभेत मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असा प्रस्ताव पनवेल मनपाचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडला होता. गायकवाड यांच्या प्रस्तावाला गुरुवारी (दि. 20) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित महासभेची मंजुरी मिळाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण …
Read More »राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक
मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा माजी कॅप्टन व ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार आहे. द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्डकपही जिंकला आहे. टीम इंडियाच्या नव्या पिढीतील बहुतेक खेळाडू …
Read More »टी-20 वर्ल्डकप आयोजनाबाबत साशंकता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाला रोखण्यासाठी बीसीसीआयने तयार केलेला बायो-बबल फुटला अन् आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू एकामागून एक पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2021 स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणार्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धा नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ही स्पर्धा भारतातच खेळवण्यात यावी यासाठी …
Read More »टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार
महिला संघांत रंगणार ऐतिहासिक कसोटी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. सहा-सात वर्षांनंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना असेल, पण यानंतर दुसर्या कसोटीसाठी …
Read More »सिडकोच्या ‘नैना’ला मिळणार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नैना प्रकल्प क्षेत्रात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांमध्ये, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्याकरिता किमान 18 मीटर रस्त्याची आणि प्रकल्प पुरस्कर्त्याने रस्त्यासह पायाभूत सुविधांचे संपादन करून विकसित करण्याची …
Read More »जेएनपीटीतून ऑक्सिजनचे देशभरात वितरण
उरण : प्रतिनिधी कोविडदरम्यान हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक असलेला 28.72 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन मंगळवारी जेएनपीटीत उतरविण्यात आला आहे. हा प्राणवायू संयुक्त अरब अमिरातीच्या जेबेल अलीमधुन आयात करण्यात आला आहे. मागील 15 दिवसांत एमव्ही जीएसएफ जिसली, एमव्ही नागोया टॉवर, एमव्ही बीएसएल लियास्सोल या तीन मालवाहू जहाजांतून 258.95 मेट्रिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper