Breaking News

Yearly Archives: 2021

आसुडगाव येथे नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर मंगळवारी (दि. 9) आसुडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट …

Read More »

उरलीसुरली अब्रू

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा पुरता पर्दाफाश झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली जबरदस्त बॉम्ब फोडला. त्याने सत्ताधारी आघाडीची उरलीसुरली अब्रूदेखील धुळीला मिळाली आहे. गेले काही महिने नवाब मलिक यांनी विविध आघाड्यांवर खरीखोटी सरबत्ती सुरू ठेवली होती. आर्यन …

Read More »

वाकण-खोपोली राज्य महामार्ग जमीन अधिग्रहण; बाधित शेतकर्‍यांची उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणाबाबत बाधित शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका (21600/2021) दाखल केली आहे. भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला व जलद नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग बेकायदा जमीन अधिग्रहण संदर्भात बाधित शेतकरी सचिन गजानन …

Read More »

महाडमधील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा धरणे आंदोलन, किसान क्रांती संघटनेचा इशारा

महाड : प्रतिनिधी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ पीक आणि भात पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विम्याची रक्कम आणि शासकीय नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिला. या वेळी …

Read More »

पालीत प्रवाशांची गैरसोय व खोळंबा

पाली : रामप्रहर वृत्त एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे दिवाळीची सुट्टी संपून निघालेले प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने सुधागडातील प्रवाशांना मंगळवारी (दि. 9) खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र अनेक खाजगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट करताना दिसत होते. वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अनेक बस थांबे …

Read More »

संपामुळे दुसर्‍या दिवशीही लालपरी आगारातच; खाजगी वाहतूकदारांची चांदी, प्रवाशांच्या खिशाला चाट

अलिबाग : प्रतिनिधी सन्मान्य तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 9) सुरूच राहिला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या आगारांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळत होता. त्यामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्‍यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. त्यांनी आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहतूकीकडे वळवला आहे. एसटीच्या रायगड विभागातील सर्व …

Read More »

आघाडीतील मंत्र्यांचे मध्यस्थ प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या विभागाच्या मंत्र्यांचे मध्यस्थ सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहाराची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत केलेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाला महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आणखी काही मध्यस्थ, तसेच सरकारी अधिकारीही या विभागाच्या रडारवर असल्याचे या घडामोडींशी संबंधित प्राप्तिकर विभागातील …

Read More »

विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : प्रतिनिधीनिवडणूक आयोगाकडून राज्यातील विधान परिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, …

Read More »

मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध

देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोपजमीन खरेदीबाबतचे पुरावे सादर मुंबई : प्रतिनिधीज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांसाठी विधानसभेत आवाज उठवणार -आमदार प्रशांत ठाकूर

ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध पनवेल : प्रतिनिधीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला अनेक वायदे केले होते, मात्र हे ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या बाबतीतही तेच घडले आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे सर्व जनता चिंतीत झाली आहे. या काळात एसटी कमर्चारी आत्महत्या करू लागला …

Read More »