शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : प्रतिनिधी ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सोमवारी (दि. 31) रस्त्यावर उतरले. धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही विद्यार्थ्यांनी …
Read More »Monthly Archives: January 2022
12 आमदारांच्या विधानभवनातील प्रवेशसाठी शेलारांचे सचिवांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजप आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. …
Read More »‘सीकेटी’त लिंग समानता विषयावर व्याख्यान
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज पनवेल (स्वायत्त) च्या इंग्रजी विभागामार्फत ’लिंग समानता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी एस. एस. ए. कॉलेज, सोलापूरच्या प्रा. डॉ. अस्मा खान (इंग्रजी विभाग) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उलवे नोड 2 चे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवधेश महतो यांच्या सौजन्याने रविवारी (दि. 30) वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उलवे नोड सेक्टर 17 प्लॉट क्रमांक 46 मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी झाडे लावा झाडे जगवा …
Read More »म्हसळ्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
म्हसळा : प्रतिनिधी शासनस्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम गावाची, तालुक्याची संस्कृती विकसित करीत असते. येथील नागरिक निर्सगाच्या सान्निध्यात आहेत, त्यांनी तो निसर्ग वाचायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन म्हसळ्याचे तहसीलदार समीर घारे यांनी येथे केले. महसूल विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून म्हसळा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये नुकताच …
Read More »अडकलेल्या ट्रेकर्सची आठ तासांनंतर सुटका; यशवंती हायकर्स, निसर्ग मित्र मदतीला
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणिकगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पेणमधील तिघा जणांच्या नवीन वाट शोधण्याचे साहस चांगलेच अंगलट आले. तब्बल आठ तास दरीच्या मध्यावर अडकल्यानंतर मदतीला आलेल्या खोपोलीतील यशवंती हायकर्स, पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेच्या सदस्यांनी, तसेच स्थानिकांनी तिघा पर्यटकांची सुटका केली. रविवारी पेण येथून दहा तरुण वडगाव (ता. खालापूर) येथील माणिकगडावर …
Read More »महाडची शान डॉ. हिम्मतराव बावस्कर
स्वराज्याची राजधानी महाडमध्ये! स्वराज्य जननी जिजाऊंची समाधी महाडमध्ये! छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महाडमध्ये! डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या समता चळवळीचे चवदारतळे महाडमध्ये! दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ महाडमध्ये! सम्राट अशोक कालीन बौद्धलेणी महाडमध्ये! सी. डी. देशमुखांचे जन्मगाव महाडमध्ये! आणि आता पद्मश्री पुरस्कार महाडमध्ये!महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या भूमीत, अनेक विचारवंत जन्माला आले. रक्ताचा एकही …
Read More »‘दिशा’कडून विधवांना हळदी कुंकवाचा मान
पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू समारंभ ‘ती’च्या नजरेतून या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदीकुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच …
Read More »विधिज्ञ् नईमा घट्टेंच्या पनवेल कार्यालयाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. पनवेल न्यायालयात होणार्या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना …
Read More »दूषित पाणीपुरवठ्यामुळे भाजप खारघर मंडल आक्रमक
उपोषणाला बसण्याचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको …
Read More »