Breaking News

Monthly Archives: January 2022

दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज

 पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी  नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले. …

Read More »

आणखी एक यशस्वी टप्पा

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात लसमात्रा यशस्वी ठरली असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खालीदेखील आलेला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी नववर्षात प्रवेश केल्यानंतर चित्र …

Read More »

चौकच्या नेताजी पालकर शाळेत हुतात्मा दिन

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा संचलित चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हुतात्मा दिन झाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा …

Read More »

करंजाडेत हळदीकुंकू समारंभ

करंजाडे : रामप्रहर वृत्त करंजाडे येथील सेक्टर 3मधील दुधे विटेवरी कॉम्पेक्समध्ये शनिवारी (दि. 29) हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या वेळी सोसायटीमधील सर्वधर्मीय 60 महिलांनी मराठमोळी पारंपरिक वेषभूषेत सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात गणरायांचे स्तवन आणि गुरूवंदनेने झाली. मकरसंक्रांत कशी व का साजरा केली जाते, तिळाचे लाडू का खाल्ले जातात, तसेच काळी …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा : सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या भेटीमुळे बालकलाकार झाले आनंदित!

पनवेल : प्रतिनिधी नागबादेवी कलामंच, वसई यांच्या एकांकिकेतील समर्थ, वरद आणि छोटी द्रोणा या बालकलाकारांची भेट सुप्रसिध्द अभिनेत संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांचे जवळ झाली असता त्यांना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघण्यासारखा होता. मौनांतर-नागबादेवी कलामंच, वसई यांनी सादर केलेल्या एकांकिकेतील हे तीन बाल कलाकार …

Read More »

‘मविआ’च्या घटक पक्षांत कुरबुरी; अहमदनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून टोलेबाजी

अहमदनगर : प्रतिनिधी मालेगाव येथील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे, मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का? आमचा नेमका मित्र कोण, हे कळत …

Read More »

‘पीओके 2024पर्यंत भारतात येईल’

कल्याण : प्रतिनिधी केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)बाबत मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त असलेला  काश्मीरचा भाग हा सन 2024पर्यंत भारतात येईल, कारण या गोष्टी पंतप्रधान मोदीच करू शकतात, असा आशावाद खासदार पाटील यांनी व्यक्त केला. ते कल्याणमध्ये बोलत होते. काश्मीरमधील कलम 370 …

Read More »

भीषण कार अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर मावळ तालुक्यातील शिलाटणे गावाजवळ रविवारी (दि. 30) सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कंटेनरला धडकलेल्या कारचा चुराडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार महामार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरचे …

Read More »

‘अटल करंडक’ स्पर्धा नव्हे; तर चळवळ!

ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ओमकार भोजने यांनी व्यक्त केल्या भावना   पनवेल : नितीन देशमुख अटल करंडक एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय आहे. गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरातील कलाकार यामध्ये भाग घेतात. स्पर्धक एकत्र येतात तो क्षण आम्हाला अनुभवायला मिळतो, जो आजच्या घडीला तितकाच अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच प्रवास प्रत्येक एकांकिका आणि कलाकाराचा आहे. ही …

Read More »

पेण सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील एका अल्पवयीय युवतीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित तरुणीची पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका हळदी समारंभात दोन तरुणांसोबत ओळख झाली होती. यातील ओळखीचे एकाशी प्रेमात रूपांतर झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा …

Read More »