Breaking News

Monthly Archives: February 2022

एक लाखासाठी आईने पोटच्या मुलाला विकले; पनवेल पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत आरोपी गजाआड

पनवेल ः संजय कदम ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलाला विकल्यानंतर स्वत: आईनेच पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर …

Read More »

14 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पनवेलचा संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 14 वर्षाखालील 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघांनी भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघाचा पराभव करीत विजेतेपदाचा मान मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या भेंडखळ संघांची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज साम्य पाटील वगळता कोतणाही …

Read More »

शुटिंगबॉल स्पर्धेत विद्युत मांडवखार संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी मॉडेल संघ रांजणखार आयोजित 63व्या कोकण विभागीय शूटिंगबॉल स्पर्धेत विद्युत मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविला, तर ए वन संघ मानकुळे उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक मॉडेल रांजणखार संघाने, चतुर्थ क्रमांक मॉर्डन स्टार रांजणखार संघाने प्राप्त केला. खारेपाटातील मॉडेल रांजणखार संघाने सलग 63व्या वर्षात पदार्पण केले असून सातत्याने स्पर्धा भरवून …

Read More »

सोनगिरी किल्ल्यावर फडकला भव्य ध्वज

वेध सह्याद्री संस्थेच्या प्रयत्नांनी मोहीम यशस्वी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कर्जत-खालापूर तालुक्यांच्या मध्यभागी संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनगिरी किल्ल्यावर वेध सह्याद्री संस्थेच्या बीड खुर्द जांबरूंग पंचक्रोशी विभागामार्फत स्थानिक रहिवासी व सहकारी संस्थेच्या सहकार्याने भव्य भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. सोनगिरी किल्ल्यावर पूर्वी असलेला ध्वज कमकुवत झाला होता. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करीत …

Read More »

पनवेलमधील आपट्याजवळ रेल्वे अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

रसायनी, मोहोपाडा : प्रतिनिधी पनवेल-पेण रेल्वेमार्गावर आपटा स्टेशनजवळ असलेल्या सारसई पुलावरून जाणार्‍या पती-पत्नीचा रेल्वेगाडीची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 7) सकाळी घडली. योगेश खंडू जगताप (वय 31) आणि रजनी योगेश जगताप (वय 26, दोघेही राहणार आपटा, ता. पनवेल) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचे मृतदेह आपटा स्टेशनपासून काही …

Read More »

लता मंगेशकर यांना नागोठण्यात श्रद्धांजली

नागोठणे : प्रतिनिधी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांना युवा पत्रकार संघाच्या नागोठणे  शाखेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. युवा पत्रकार संघाच्या नागोठणे विश्रामगृहात झालेल्या शोकसभेला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राज वैशंपायन, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, नागोठणे शाखा …

Read More »

पेणमध्ये विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप

पेण : प्रतिनिधी माजी केंद्रप्रमुख कृष्णा वर्तक यांनी आपला 70 वा वाढदिवस पेण, वढाव, रामवाडी येथील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करून साजरा केला. कृष्णा महादेव वर्तक हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बळीराम गणा हायस्कूल-वढाव, लिटिल एंजल्स स्कूल-पेण, ओम साई क्लासेस-रामवाडी, समर्थ क्लासेस-रामवाडी, …

Read More »

वांगणीत भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा; जुन्या आठवणींना उजाळा

कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या 1982-83 च्या दहावी इयत्तेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वांगणी येथील मोरे नर्सरीमध्ये पार पडला. यावेळी 39 वर्षानंतर शाळाच भरल्यासारखे वाटत होते. राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याची सुरूवात झाली. मेधा वैद्य, सुनील हरपुडे, स्वाती शिंदे, विनोद राणे, केदार देशक, अनुप मावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  …

Read More »

मुलांवर संस्कार करणे ही काळाची गरज -माधुरी मुळीक

कर्जत : बातमीदार लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आई म्हणून आपली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी महिलांनी कुटुंबासाठी वेळदेखील द्यायला हवा, असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केले. गुरुचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि रणरागिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ मोहाचीवाडी येथील शनी मंदिरात महिलांसाठी शिवणकला आणि …

Read More »

वणव्यांमुळे सुधागड तालुक्यातील वनसंपदा, पशू-पक्षी होताहेत नष्ट ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील डोंगरांना लागणार्‍या वणव्यांमध्ये झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा होरपळून मृत्यू होत आहेत. सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. डोंगर-दर्‍यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. सुधागड तालुक्यातील किल्ले, गड, जंगल या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात छोटी झुडपे व …

Read More »