Breaking News

Monthly Archives: February 2022

आत्महत्या रोखण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण

पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले. या काळात अनेकांचे रोजगारदेखील हिरावले, जवळचे नातेवाईक दूर झाले. अशीच परिस्थिती संजय बिस्वास उर्फ संजय बंजारा या तरुणावर आली. त्याने नैराश्यात आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्यानंतर सायकलिंगने त्याला नवचेतना देऊन तारले व आत्महत्येपासून परावृत्त केले. मग हा तरुण आत्महत्या रोखण्याचा संदेश …

Read More »

मुरूड ग्रामीण रुग्णालयाची मद्यपी रुग्णाकडून तोडफोड

सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचारी हतबल मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मद्यपी रुग्णाने मंगळवारी मध्यरात्री (दि. 8) रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. रुग्णालयात एकही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्याला कोणी रोखू शकले नाही. दरम्यान, या आरोपीवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत असलेला …

Read More »

बोटीतून प्रवासी समुद्रात पडला, पोहता येत असल्याने बचावला

मुंबई गेट वे-मांडवादरम्यानची घटना अलिबाग : प्रतिनिधी मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी भर समुद्रात पडल्याची घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली. प्रशांत कांबळे असे या प्रवाशाचे नाव असून पोहता येत असल्याने तो वाचला आहे. स्वतःच्या चुकीमुळे बोटीतून पडला असल्याने याबाबत …

Read More »

परशुराम घाटात दरड कोसळली; एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी (दि. 8) दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम सुरू असताना मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास दरड कोसळली. डोंगराचा मोठा भाग अचानक खाली आल्याने …

Read More »

काँग्रेसची कृष्णकृत्ये

गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेसची निरंतर पडझड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. किमान माध्यमांमधून तरी तसेच चित्रण वारंवार होते, परंतु ही पडझड गेल्या आठ वर्षांपासून नव्हे, तर तीन-चार दशकांपासूनच सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत भाषण करताना गेल्या काही दशकांतील काँग्रेसच्या कृष्णकृत्यांचा जो पाढा वाचला, …

Read More »

सूर्यनमस्कार महायज्ञात सीकेटी महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग; विद्यार्थ्यांनी घातले 12,803 सूर्यनमस्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील आरोग्य सेवा समिती (योग केंद्र)तर्फे नुकताच रथसप्तमी उत्सव साजरा झाला. या उत्सवांतर्गत 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. सीकेटी विद्यालयातील इयत्ता नववीच्या …

Read More »

शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक; ट्रकचालकाचा महसूल अधिकार्‍यांना चकमा

पनवेल ः वार्ताहर शासनाचा महसूल बुडवून अवैध मार्गाने खडीची वाहतूक करून ट्रक घेऊन जाणार्‍या चालकाने महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना चकमा देऊन ट्रकसह पलायन केल्याचा प्रकार तळोजा येथे घडला आहे. या ट्रकचालकाविरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. काही टोळ्या या गौण खनिजाचे अनधिकृतरित्या उत्खनन करून शासनाचा महसूल …

Read More »

जेएनपीटीच्या नव्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या नियुक्त्या

उरण ः वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी नव्याने स्थापन झालेल्या मेजर पोर्ट अ‍ॅक्टनुसार बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 12 सदस्यांपैकी सात सदस्यांच्या नियुक्तया केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे जांईट सेक्रेटरी विक्रम सरकार यांनी जाहीर केल्या आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी आता नव्याने मेजर पोर्ट अ‍ॅक्ट अस्तित्वात आला आहे. त्यामुळे जुना अस्तित्वात …

Read More »

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाची शिळफाटा येथे कारवाई, पावणेसहा लाखांचा साठा हस्तगत; दोघे ताब्यात

पनवेल ः वार्ताहर अमली पदार्थविरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास पाच लाख 89 रुपयांचा अमली पदार्थ, रोख रक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ …

Read More »

गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे आदरांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे सोमवारी (दि. 7) पोलीस ठाण्यासमोरील चौकात  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी,  सरचिटणीस शरद जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर …

Read More »