Breaking News

Monthly Archives: March 2022

सुधागडमध्ये लग्नसोहळ्यात दारू आणि डिजेवर बंदी

21 गणपती पंचक्रोशी मराठा समाजाचा एकमुखी निर्णय पाली : प्रतिनिधी लग्नसोहळ्यात दारू व डिजेला बंदी असा निर्णय सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर येथील 21 गणपती मंदिरात बुधवारी (दि. 23) झालेल्या 11 गाव मराठा समाजाच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाढती महागाई तसेच कोरोनामुळे  रोजगारावरही गदा आल्याने आर्थिक …

Read More »

कर्जतमधील भिसेगाव-चारफाटा रस्त्याला अनेक विघ्ने; काम ठप्प

कर्जत : बातमीदार शहरातील भिसेगाव ते चारफाटा या सुमारे 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदिकरण करण्यात येत आहे. त्यासाठी या रस्त्याने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या पावसाळ्यापासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या एका बाजूला सिमेंटकाँक्रीटचा थर टाकला आहे, मात्र दुसर्‍या बाजूला फक्त खोदकाम …

Read More »

शहीद दिनानिमित्त ठिकठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन

मुरूड : प्रतिनिधी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन करंदेकर यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि. 23) शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना आदरांजली वाहण्यात आली.करंदेकर त्यांच्या निवासस्थानी सलग 40 वर्षापासून शहिद दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. करंदेकर दाम्पत्य दिवसभर निर्जळी उपवास पाळून शहीद दिन साजरा करतात. बुधवारी सकाळी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह …

Read More »

पोलादपुरात शिवजयंती मिरवणुकीत अफजल खान वधाचे पथनाट्य

पोलादपूर : प्रतिनिधी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळा तर्फे सोमवारी (दि. 21) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी पोलादपूर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शंकरराव गोपाळराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अफझलखान वधाच्या पोवाड्यावर आधारित पथनाट्य सादर केले. त्याचे शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक शिवप्रेमींनीही विविध देखावे सादर करून या …

Read More »

महाडमध्ये कातकरी उत्थान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी व महाड तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील भावे येथे आयोजित केलेल्या कातकरी उत्थान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध दाखल्यांचे वाटप तसेच लसीकरण  करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यातील भावे येथे कातकरी उत्थान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

बैलगाडी शर्यतीतील अपघातांना जबाबदार कोण?

बैलगाडी शर्यती ही महाराष्ट्रातील परंपरा आहे. पंरतु या शर्यतींमध्ये होणारे अपघात, बैलांना होणारी मारहाण यामुळे बैलगाडी शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधत लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने अटी आणि शर्तींवर बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतींना पुन्हा सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणावर बैलगाडी शर्यती होऊ लागल्या आहेत. …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सांगितीक होळी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त गेली दोन वर्षे कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात करमणुकीचे कार्यक्रम न झाल्याने बुधवारी (दि. 23) झालेल्या सभेत सांगितीक होळी साजरी करण्यात आली. प्रथेप्रमाणे प्रथम सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यांत आले. ज्येष्ठ महिलांनी सादर केलेल्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अनुप्रिता काळण यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीस काही महिलांनी, किती …

Read More »

नवी मुंबईतील बसथांबे झाले वामकुक्षीची ठिकाणे

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा परिवहनकडून शहरात विविध ठिकाणी बसथांबे उभारले गेले. या बसथांब्यांचा वापर भिकारी, बेघर नागरिक व मद्यपी दुपारच्या वेळी वामकुक्षीसाठी करीत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटी आणि बेस्ट बसेसची विविध बसथांब्यांवर वाट पहावी लागते. म्हणून आरामदायी बसथांब्यांची परिवहन उपक्रमाकडून निर्मिती …

Read More »

नगरसेवक अमर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

रोडपाली येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील रोडपाली येथे नगरसेवक अमर पाटील यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. फेब्रुवारी महिन्यात रोडपाली परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात रिझ्युम बिल्डिंग कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापान शिक्षण विभागातर्फे रिझ्युम बिल्डींग या विषयावर कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक आरती कारवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. या व्याख्यानामध्ये रिझ्युम म्हणजे काय? रिझ्युम कसा तयार करावा? तसेच रिझ्युम तयार …

Read More »