पनवेल : प्रतिनिधी मालमत्ता कर भरण्यासाठी क्यू आर कोडची सोय संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा पनवेल महापालिकेने नागरिकांसाठी कार्यान्वित केली आहे. बरेचदा मालमत्ता कराची पावती गहाळ होते, किंवा अनेक दिवसांपासून कर न भरल्याने नेमका दंडासह आपल्याला किती कर भरावा लागेल हे माहित नसते, मात्र आता महापालिकेकडून नागरी सेवा केंद्रावर कर धारकांकरिता एक …
Read More »Monthly Archives: March 2022
रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा नवा विक्रम
धरमतर ते मांडवा 26 किमी अंतर केले पोहून पार अलिबाग : प्रतिनिधी रुद्राक्षी टेमकर या अवघ्या 11 वर्षीय मुलीने आज धरमतर ते मांडवा हे सागरी 26 कि.मी. अंतर पाच तास 54 मिनिटांत पोहून पार केले. रुद्राक्षी टेमकरच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. मूळची अलिबाग तालुक्यातील नवीन शहाबाज येथील …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रोवला – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रोवला म्हणूनच आज आपण स्वराज्याची फळे चाखत आहोत त्या प्रखर स्वराज्य निष्ठेची जाणीव ठेवून लोकशाही मूल्यांची जपणूक करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. उलवे नोडे येथील सेक्टर 16 मध्ये शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई : प्रतिनिधी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्जदेखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या 23 फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या …
Read More »प्रमोद सावंत पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी
पणजी : वृत्तसंस्था गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक …
Read More »शिवजयंतीवरून ‘मविआ’मध्ये मतभेद
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरामध्ये तिथीनुसार साजरी केली. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. असे असतानाच राज्यात सत्तेत असणार्या शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीच्या एका आमदाराने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याला विरोध केलाय. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 21) शिवजयंतीचे (तिथीनुसार) औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख हे प्रमुख वक्ते …
Read More »उतेखोल गावच्या लेकींनी आणली रायगड किल्ल्यावरून शिवज्योत
माणगाव : प्रतिनिधी उतेखोल गावातील काही तरुणींनी शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि. 21) किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली. शिवजयंती निमित्ताने गावोगावच्या तरुणांनी किल्ले रायगडहून शिवज्योत आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु तरुणींनी आपल्या गावात शिवज्योत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण माणगाव तालुक्यात उतेखोल गावच्या तरुणींचे विशेष कौतुक होत आहे. …
Read More »उरण येथे शिवकालीन शस्त्र, दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन
उरण ः वार्ताहर मी उरणकर प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र व दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन सोमवारी (दि. 21) येथे भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला म्हाडा माजी सभापती राज्यमंत्री दर्जा बाळसाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. तर नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य महेंद्र पाटील, नगरसेवक …
Read More »पेण धोंडपाडा येथे तुकाराम बीजोत्सव
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धोंडपाडा येथे 14 ते 21 मार्चपर्यंत तुकाराम बीज उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या काळात रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. यावेळी मंदिर परिसरात …
Read More »