कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज नागेवाडी येथील जना चांगो कांबडी (वय 47) या अदिवासी बांधवांला 2014 साली विजेचा शॉक लागून अपघात झाला होता. त्यात त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. कामोठे (पनवेल) येथील एकता सामजिक संस्थेने जना चांगो कांबडी यांना व्हीलचेअर, पलंग तसेच दिव्यांगाला आवश्यक असणारे साहित्य दिल्याने जना कांबडी यांचे …
Read More »Monthly Archives: March 2022
रायगड जि.प. वर अखेर प्रशासक
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा (राजिप) कारभार सोमवारपासून (दि. 21) प्रशासकाच्या हाती गेला आहे. राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हेच पराशासक आहेत. राजिपवर प्रशासक नेमण्याची ही तिसरी वेळ आहे. जिल्हा परिषद स्थापन होण्यापूर्वी जिल्हा लोकलबोर्ड होते. 1962 साली रायगड जिल्हा परिषद स्थापन झाली. केशवराव (दादासाहेब) लिमये हे …
Read More »अंगार आणि भंगार
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमोर दोस्तीचा हात पुढे केला आणि नव्याच वादाला तोंड फुटले. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या एमआयएमच्या ऑफरमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जायचा तो गेलाच. पूर्वीच्या काळी एमआयएमची अशी हिंमत तरी झाली असती का, या एकाच प्रश्नाचे उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वत:लाच प्रामाणिकपणे द्यावे. अंगार कोण आणि भंगार …
Read More »रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासक
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेवर सोमवार (दि. 21)पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेची मुदत रविवारी संपुष्टात आली. विद्यमान जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सलग पाच वर्षे सत्ता राहिली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे अध्यक्षपद होते, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी …
Read More »खोटे सोने तारणातून कामोठ्यात बँकेला 34.56 लाखांचा गंडा
पनवेल : वार्ताहर कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमध्ये पाच ग्राहकांनी एक किलो 199 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवत बँकेकडून एकूण 34 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सोन्याचे मुल्यांकन करणार्या बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करून या सर्वांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे कामोठे …
Read More »कसळखंड गावात विकासकामांचा शुभारंभ
सरपंच माधुरी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड गु्रप ग्रापंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत आमदार महेस बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून करण्यात येणार्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) झाले. तसेच …
Read More »खारघरमधील भुयारी मार्गाची डागडुजी
भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्टेशनबाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत रविवारी (दि. 20) या भुयारी मार्गामधील …
Read More »सामाजिक संघटनांनी शासन व लाभार्थ्यांमधील दुवा बनावा
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती अध्यक्ष भिकू इदाते यांचे आवाहन अलिबाग ः रामप्रहर वृत्त केंद्र स्तरावरील विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते हे दि. 16 व 17 मार्च दरम्यान रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर होते. गुरुवारी (दि. 17) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील अधिकारी व विविध …
Read More »माणगाव कुणबी समाज मंडळातर्फे संत तुकाराम बीज
माणगाव ः प्रतिनिधी सालाबादप्रमाणे माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळातर्फे हभप जयराम खाडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज व सत्कार सोहळा रविवारी (दि. 20) तालुका कुणबी विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. या दिवशी सकाळी हभप गुगले महाराज निळगुण यांच्या हस्ते मूर्तीचे …
Read More »खोपोलीत रक्तदान शिबिर उत्साहात
खोपोली : वार्ताहर वासुदेव सेवा मंडळ तसेच स्वराज्य मित्रमंडळ, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात खोपोलीतील 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. खोपोली शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या वासुदेव सेवामंडळ तसेच मोगलवाडी येथील स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने किशोर ओसवल यांच्या निवासस्थानी समर्पण रक्तपेढी मुंबई यांच्या …
Read More »