Breaking News

Monthly Archives: May 2022

जमिनीच्या पैशासाठी भाच्याने केला मामाचा खून

गुन्हात मामीदेखील सामिल; दोन वर्षांनी फुटली हत्येला वाचा खोपोली : प्रतिनिधी जमिनीचा पैसा हडपण्यासाठी भाच्याने मामाचा थंड डोक्याने काटा काढला. मात्र खालापूर पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे तब्बल दोन वर्षांनी या खुनाला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.  खालापूर पोलिसांना 1 जुलै 2020 रोजी जुन्या मुंबई-पुणे महा मार्गावर …

Read More »

अलिबाग तालुक्यात हर घर जल योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची मागणी

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपच्या जगदिश घरत यांचे निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई असून केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश घरत यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री कपिल …

Read More »

अंबा नदीचे पाणी झाले चिखलयुक्त; पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो.  गुरुवारी (दि. 5) उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न …

Read More »

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत अग्नितांडव

आठ कंपन्यांना आग; चार कामगार जखमी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. 6) आठ कंपन्यांना भीषण आग लागून चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला एका कंपनीला आग लागून ती पसरली. या आगीत इतर सात कंपन्यांचेही नुकसान झाले …

Read More »

अलिबागमध्ये उद्या बिझनेस फोरम

प्रदीप ताम्हाणे करणार व्यावसायिकांना मार्गदर्शन अलिबाग : प्रतिनिधी लायन्स क्लब अलिबागतर्फे रविवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बिझनेस फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विख्यात उद्योजक प्रदीप ताम्हाणे अलिबागमधील व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर व्यवसाय टिकविणे आणि वृद्धिंगत करण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अलिबागमधील …

Read More »

शिक्षक सेवाज्येष्ठतेसाठी 31 मेऐवजी 30 जून तारीख निश्चित

ग्रामविकास विभागाने केले शिक्कामोर्तब, शिक्षक परिषदेच्या लढ्याला यश अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी 31 मे ऐवजी 30 जून ही तारीख सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरण्यात यावी,  याबाबत शिक्षक परिषदेने सातत्याने निवेदने देऊन  चर्चा घडवून तसेच न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केलेला होता. त्या अनुषंगाने 4 मे रोजी ग्रामविकास …

Read More »

राजर्षि शाहू महाराजांना पालीमध्ये अभिवादन

पाली : प्रतिनिधी राजर्षि शाहू महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथी निमित्त पालीमधील नागरिक, तहसीलदार व पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 6) शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन केले. या वेळी शाहू महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्यात आले. सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समतेची बीजे रोवली असल्याचे …

Read More »

मुरूडमधील दत्तवाडी रस्त्यावर गतिरोधक बसवा; नागरिकांची मागणी

मुरूड : प्रतिनिधी शहरातील परेश हॉटेल ते दत्तवाडी या मुख्य रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावर सूचना फलक लावावेत व गतिरोधक उभारावेत, अशी मागणी दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुरूड दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी  सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन लेखी …

Read More »

कर्जतच्या पुनर्वसन केंद्राला आर्थिक, धान्याची मदत

खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी   खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष शास्त्र फाउंडेशन कोर्स विषयाच्या विद्यार्थ्यांनी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला स्वेच्छेने आर्थिक तसेच धान्य आणि अन्य आवश्यक वस्तूंची मोठी मदत केली आहे. ही मदत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप …

Read More »

समाजाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तरुणाईने पुढे यावे -सूर्यकांत पाटील  

वडखळ येथे आगरी सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पेण : प्रतिनिधी आगरी समाजाचे अस्तित्व जपणार्‍या संस्थेची ताकद मजबूत करण्यासाठी आणि ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्यासाठी तरुणाईने संस्थेच्या कार्यात उतरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी येथे केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच …

Read More »