Breaking News

Monthly Archives: June 2022

रोह्यात होणार यांत्रिक पद्धतीने भात लागवड

रोहे : प्रतिनिधी मजूरांची टंचाई पहाता यापुढे रोहा तालुक्यात यांत्रिक पध्दतीने भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रोहा तालुक्यात ठिकठिकाणी यांत्रिक पध्दतीने भातलागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीतील कामे अत्यंत सुलभ व्हावी, या दृष्टीने अनेक अवजारे शेतीच्या कामात उपयुक्त व्होवू लागली आहेत.नांगरणी, फवरणीसह अन्य कामे यांत्रिकी …

Read More »

गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कर्जत : बातमीदार ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने कर्जत तालुक्यातील गौरकामत येथील शाळेसाठी पाणीपुरवठा योजना राबविली असून, या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी या भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना संस्थे तर्फे संगणक वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण …

Read More »

रायगडकरांना 44 कोटींचा चुना, दीड वर्षात फसवणुकीचे 224 गुन्हे

खोपोली : प्रतिनिधी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा व्यवहारात उपयोग न केल्याने, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी  गेल्या दिड वर्षात दोनशे चोवीस फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात 44 कोटी रुपये गमावले आहेत. रायगड जिल्ह्यात सन 2021 पासून जून 2022 पर्यंत 224 फसवणूक, अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात नागरिकांची 44 कोटी रूपयांची फसवणूक …

Read More »

विविध विकासकामांसाठी निधी मिळावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कृष्णा कोबनाक यांचे निवेदन माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी शनिवारी (दि. 18) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या वेळी कोबनाक यांच्या समवेत भाजपचे माणगाव तालुका …

Read More »

खोपोली येथील विश्रामगृह मोजतेय शेवटच्या घटका

सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासिनता खोपोली : प्रतिनिधी एकेकाळी राजकीय, कामगार क्षेत्रातील घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेले खोपोली विश्रामगृह सध्या पडीक आवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची मोक्याची जागा हडप होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई, पूणे शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आणि विकासाचा मार्ग …

Read More »

खारघरमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्या अनुषंगाने खारघरमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि. 22) करण्यात आले. या कामांमध्ये खेळाची मैदाने व उद्यानातीन कामांचे, मलनिस्सारण वाहिनी व गटाराच्या कामाचे …

Read More »

शिवसेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद

 केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची टीका मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप …

Read More »

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहर कार्यकारी समितीची बैठक

पनवेल : वार्ताहर केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारी समितीची बैठक नुकतीच मंगळवारी (दि. 21) उपायुक्त कैलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी, राष्ट्रीय …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडको घेराव आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी ‘दिबा’साहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी …

Read More »

खुटारी येथे हरिनाम सोहळा उत्साहात

श्री चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील खुटारी येथे श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने श्री. संत वामनबाबा महाराज, श्री. संत सावळाराम बाबा महाराज, श्री. संत आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री. चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन व नाम चिंतन हरिनाम सोहळा भक्तिमय वातावरणात …

Read More »