Breaking News

Yearly Archives: 2022

दुर्दैवी युती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्तांतरानंतर गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेला गळतीच लागलेली पहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी केलेली संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा शिवसेनेचा दुर्दैवी दुबळेपणाच अधोरेखित करते. दादर येथील …

Read More »

पनवेलमधील ओवेत नळपाणी योजनेची वचनपूर्ती

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ओवे गावातील पाण्याची समस्या सुटली असून या नळपाणी योजनेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. येथील समस्यांसंदर्भात परेश ठाकूर यांनी पाहणी दौरा करून समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर, शिक्षकवर्गाचे ‘रयत’च्या पदाधिकार्‍यांकडून कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला. त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे ते रायगड, नवी मुंबईतील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्या अनुषंगाने रयत …

Read More »

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना शनिवारपासून टोलमाफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 27)पासून करण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 11 सप्टेंबरपर्यंत असणार …

Read More »

मराठा आरक्षण निवडसूचीतील 1064 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या एक हजार 64 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे जाहीर केले. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते …

Read More »

दहिवली येथील धाडसी घरफोडी उघडकीस

तीन आरोपी जेरबंद, नऊ लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळील दहीवली येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. अलेक्झांडर मरियाराज …

Read More »

पिरवाडी सागरी किनारी स्वच्छता अभियान

उरण ः वार्ताहर जेएनपीएतच्या वतीने बंदरात केंद्र सरकारच्या बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र उपक्रमांतर्गत उरणनजीकअसलेल्या पिरवाडी सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष व कर्मचार्‍यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. या मोहिमेद्वारे, प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे, …

Read More »

स्वच्छतागृहांची माहिती देणार अॅप

पनवेल महापालिकेच्या स्वच्छता हर कदम मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छतागृहांची माहिती देणारे ’स्वच्छता हर कदम’ या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) मुख्यालयात करण्यात आले. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून हे अ‍ॅप व्हॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे. स्टार्टअप …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 26 ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात डीएलएलई प्रशिक्षण कार्यक्रम

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 26) लाईफ लाँग लर्निंग अ‍ॅण्ड एक्सटेशन मुंबई विद्यापीठ विभागातर्फे डीएलएलईचा प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी डीएलएलई मुंबई विद्यापीठचे अध्यक्ष डॉ.कुणाल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच …

Read More »