Breaking News

Yearly Archives: 2022

श्रीवर्धनमधील प्रीमियर लीगमध्ये एसजीसीसी लायन संघ विजेता

श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या स्पर्धेत एसजीसीसी लायन संघाने विजेतेपद पटकाविले, तर एसजीसीसी किंग संघ उपविजेता ठरला. स्पर्धेतील मालिकावीर विशाल सातम, उत्कृष्ट फलंदाज यशवंत वाठोरे, उत्कृष्ट गोलंदाज नंदन सातम, ऑरेंज कॅपचा मानकरी मिहीर सातम, पर्पल …

Read More »

केळवण्यातही ‘हर घर नल, हर घर जल’

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या …

Read More »

जेएनपीएच्या रेल्वे यार्ड, प्रशासकीय भवनाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीएने बंदरात बांधलेल्या डीएफसी  कंप्लायंट रेल यार्ड आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी त्यांनी जेएनपीएच्या पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन करताना बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये एसटी बसला अपघात; 14 प्रवासी जखमी

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन आगाराची एसटी बस सोमवारी (दि. 16) सकाळी साखरोणे फाटा येथे रस्त्यावर उलटली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. श्रीवर्धन आगाराची नियमित फेरी असणारी बागमांडला ते श्रीवर्धन ही एसटी बस (एमएच 14-बीटी 2738) बागमांडला येथून मार्गस्थ होऊन कोलमांडला, धारीवलीमार्गे श्रीवर्धन येथे येत होती. साखरोणे फाटा येथील …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कोरोना संकटकाळातील अतुलनीय कार्याबद्दल सन्मानित

पनवेल :  सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सेवाभावी कार्यात अग्रगण्य असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने कोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात शहरी व ग्रामीण भागातील तळागाळात मदतीचा हात देऊन लाखो नागरिकांना संरक्षित केले आहे. त्याबद्दल पनवेल महापालिकेच्या वतीने कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना सुरू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील  वन्यजीव मोजणीस सोमवारी (दि. 16) सुरुवात करण्यात आली. अभयारण्यातील प्रत्येक प्राण्याची मोजणी व नोंद एका वहीत करण्यात येणार असून हा रेकॉर्ड काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे. फणसाड अभयारण्यामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीवांची मोजणी केली जाते.त्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून पाणस्थळांच्या ठिकाणी  काठ्यांची मचान बनवण्यात …

Read More »

माथेरान पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला सहा जणांच्या हरकती

कर्जत : बातमीदार एक जानेवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या 20 जागांसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आरखडा जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यांनी जाहीर केला आहे. या प्रारूप आराखड्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या संभाव्य आरक्षणास हरकती घेण्यात आल्या आहेत. माथेरान गिरिस्थान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. …

Read More »

भाजप नेते कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते बनोटी (म्हसळा) येथे समाज मंदिराचे उदघाटन

म्हसळा : प्रतिनिधी बदलत्या युगात तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे ते स्वीकारून नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या समाज मंदिराच्या इमारतीचा वापर करावा, असे आवाहन भाजप नेते कृष्णा कोबनाक यांनी सोमवारी (दि. 16) म्हसळा तालुक्यातील बनोटी येथे केले. चिंचबादेवी प्रासादिक भजन मंडळाने बनोटी येथे उभारलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन सोमवारी कृष्णा …

Read More »

खालापुरात अनेक पक्ष्याच्या प्रजाती बेघर

बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम खोपोली : प्रतिनिधी विकासाच्या नावाखाली खालापूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोङ झाली असून, वनसंपदेबरोबर वन्यजीव संपदेवरदेखील घाला घातला आहे. खालापूर तालुक्यातून राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पूणे द्रूतगती महामार्ग जातो. पाली-खोपोली, पेण-खोपोली, पळसदरी-कर्जत या राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रुंदिकरणाचे   कामदेखील झाले आहे. …

Read More »

खोपोलीतील गटारे, नाले, तुंबलेल्या अवस्थेत

 नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष खालापूर : प्रतिनिधी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.  मात्र खोपोली नगर परिषद प्रशासन पावसाळ्यापुर्वीची  नालेसफाई व वार्डातील साफसफाई करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात खोपोलीतील सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोपोलीत अत्यावश्यक सेवेबरोबरच मान्सूनपुर्व कामांकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. …

Read More »