Breaking News

Monthly Archives: January 2023

खालापूर परिसरात माती उत्खनन सुरूच; महसूल विभाग अंधारात

प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी खालापूर : प्रतिनिधी शासनाची कोट्यवधीची रॉयल्टी बुडवून सुरू असलेल्या माती उत्खनन आणि वाहतुकीला दोन ठेकेदारांच्या भांडणांमुळे वाचा फुटली असून तलाठी, मंडल अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी मात्र धृतराष्ट्राच्या भुमिकेत आहेत. तसेच या परिसरातील अनेक ठिकाणी माती उत्खनन सुरू असून महसूल विभाग मात्र अंधारात आहे. तालुक्यातील वावोशी …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. 28) क्षितिज ः ड्रीम मिन्स रियालिटी या आशयाखाली वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे मुंबई …

Read More »

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी मतदान

मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी राजकीय पक्ष तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात कोकण, औरंगाबाद व नागपूर शिक्षक, तर नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर …

Read More »

माथेरानमध्ये घोड्यावरून पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू

कर्जत ः प्रतिनिधी माथेरानमध्ये घोड्यावरून पडून जखमी झालेल्या पर्यटकाचा शनिवारी (दि. 28) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद काशीद इम्तियाज शेख असे या पर्यटकाचे नाव असून तो मुंबईचा राहणारा होता. मोहम्मद शेख, त्यांची पत्नी व मित्र असे चार जण 25 जानेवारीला माथेरानमध्ये फिरावयास आले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते घोडेस्वारीसाठी तेथील हार्ट …

Read More »

ऑडी गाडीमधील हत्येप्रकरणी आणखी दोघे ताब्यात

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत ऑडी गाडीत झालेल्या हत्येप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आणखी दोघा जणांना सहआरोपी म्हणून गजाआड केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत पुणे येथील व्यापारी व नामचीन गुंड संजय कार्ले यांची सोन्याच्या देवाण-घेवाण वरून हत्या करण्यात आली होती. तसेच त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून …

Read More »

पनवेल परिसरात अपघातांमध्ये दोन जण ठार; एक जखमी

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार व एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर व खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दादर वरून पुणे येथे पार्सल घेऊन टेम्पोचालक रविकांत तिवारी जात असताना त्याने पनवेलजवळील पळस्पे येथे संतोष उदावंत या व्यक्तीला …

Read More »

दुर्ग सहल! महाविद्यालयीन मावळ्यांची राजगडावर स्वच्छता

पनवेल : रामप्रहर वृत्त गडकिल्ले हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रम गाथा असणारा ऐतिहासिक ठेवा आहे आणि या गडांचे जतन आणि संवर्थन होणे अत्यंत आवश्यक आहे या उदात्त हेतूने पुण्याच्या ’उनाड’ ह्या महाविद्यालयीन युवा युवतींच्या समूहाने आपल्या 55 मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकीर्दीतला  प्रारंभीचा केंद्रबिंदू असणारा भोर येथील राजगड …

Read More »

पनवेलमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरात चोरी, लुटूमार अशा घटना पाहायला मिळात आहेत. नुकतेच पायी चालणार्‍या महिलेच्या गळ्यातील लक्ष्मीहार चोरट्यांनी हिसकावून तेथून पळ काढला. यामुळे शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असल्याची चर्चा आहे. नऊ दिवसांपुर्वी (18 जानेवारी) रात्री सव्वा दहा वाजता तक्का परिसरात राहणार्‍या 64 वर्षीय सुहासिनी कुर्ले या त्यांच्या …

Read More »

बोगस मतदार नोंदणीसंदर्भात पनवेलमधील पाच शाळांना नोटीस

गटशिक्षण अधिकार्‍यांनी दिले कारवाईचे निर्देश पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजेच 30 जानेवारीला होत असून या निवडणुकीच्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणीसंदर्भात पनवेल तालुक्यातील पाच शाळांना पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस. आर. मोहिते यांनी शनिवारी (दि. 28) नोटीस बजावून कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोकण विभाग …

Read More »

लिमये महाविद्यालयातर्फे ग्राम-शहर विकास शिबिर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये (एसएमडीएल) महाविद्यालयाच्या एन. एन. एस. विभागाद्वारे आयोजित युवकांचा ध्यास : ग्राम – शहर विकास हे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर स्व. छाया आत्माराम पाटील स्कूल मानघर, पनवेल येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कार्यवाहक गीताताई पालरेचा …

Read More »