Breaking News

Monthly Archives: February 2023

मातृभाषेकडे पाठ फिरवू नका -आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

खोपोली : प्रतिनिधी इंग्रजीचे शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे म्हणून पालक प्रयत्नशील आहेत. इंग्रजी विषयाचे पुस्तक सोपे झाले पाहिजे. त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, पण मराठी माध्यमाच्या शाळा वाचविणे हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे पालकांनी मातृभाषेकडे पाठ फिरवू नये, असे आवाहन कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवचनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शनिवारी (दि. …

Read More »

वावर्ले येथे साकारतोय मुंबई विभागातील सर्वांत लांब रेल्वे बोगदा

कर्जत : प्रतिनिधी पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर नवी दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम केले जात आहे. या मार्गावर कर्जत ते वावर्लेदरम्यान उभारला जात असलेला बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी 2005मध्ये पनवेल-कर्जतदरम्यान एकेरी मार्गिका टाकण्यात आली होती. त्या मार्गिकेतील वावर्ले ते हालिवली बोगद्यात तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय लोकल …

Read More »

कर्जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत

आरपीआय आठवले गटाची मागणी कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरातील सरकारी दवाखाना जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरातील परिस्थितीची माहिती असायला हवी यासाठी कर्जत पोलीस दलाने तेथे सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी लेखी निवेदन देवून केली आहे. कर्जत येथील भारतरत्न …

Read More »

तुपगाव-चौक येथील गटाराचे काम मार्गी

दोन्ही सरपंच एकमेकांच्या सहकार्याने करताहेत सामाजिक कार्य चौक : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव व ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीवरील गटाराचे काम रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे व सरपंच रविन्द्र कुंभार यांच्या प्रयत्नाने होणार आहे.त्यामुळे हा परिसर दुर्गंध मुक्त होईल. चौक-लोहोप मार्गावरील चौक -तुपगाव हद्दीवरील असणार्‍या इमारतींचे सांडपाणी रस्त्यावर येत …

Read More »

बदलते हवामान व परिणाम

गेल्या काही दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल जाणवू लागला आहे. एकीकडे सकाळी व रात्री वातावरणात गारवा असताना दुसरीकडे दिवसा मात्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वातावरणात अचानक होणार्‍या या बदलाचे परिणाम शेतीवर तर होतच असतात, शिवाय मानवी आरोग्याच्या तक्रारीदेखील सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे वरचेवर वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षी जोरदार पाऊस पडला. …

Read More »

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला

पनवेल ः वार्ताहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दुचाकी वाहन चोरीचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी ई-चलनद्वारे मूळ मालकाशी संपर्क साधून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पळस्पे वाहतूक केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल, उपनिरीक्षक केसरकर, पळस्पे मोबाईल केंद्राचे अंमलदार भगत, परदेशी, महाजन या आपल्या पथकासह नेहमी प्रमाणे पेट्रोलिंग करीत …

Read More »

रिचार्जचे कापलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात अडीच लाख गमावले

पनवेल ः वार्ताहर मोबाईल रिचार्जची बँक खात्यातून कट झालेली 399 रुपयांची रक्कम परत मिळविण्याच्या नादात एका सुरक्षारक्षकाने दोन लाख 65 हजार रुपये गमावल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील सुरक्षारक्षकाला गंडा घालणार्‍या सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार देवेंद्रदेव …

Read More »

गुटखा घेऊन येणार्‍या ट्रकवर कारवाई

पोलिसांनी जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल पनवेल ः वार्ताहर गुजरातहून नवी मुंबईत अवैधरित्या गुटखा आणून विकणार्‍या टोळीवर तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करीत एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबई येथील महापे चेकपोस्ट येथे तुर्भे पोलीसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या 30 मोठ्या गोणी …

Read More »

पुढील पंधरा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असेल -विनोद तावडे

कर्जत : प्रतिनिधी रक्ताचा एक थेंबही न सांडता कलम 370 रद्द करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार न होता श्री राम मंदिर उभारले जात आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्या पासपोर्टला परदेशात किंमत नव्हती. अशा अनेक चांगल्या गोष्टी आतापर्यंत झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे. पुढील पंधरा वर्षे भारतीय …

Read More »

रेशनिंग दुकानदारा विरोधात पाचाडमध्ये उपोषण सुरूच

महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशन धारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण दुसर्‍या दिवशी देखील सुरूच राहिले आहे. पाचडमध्ये सुमारे 380 रेशन कार्डधारक आहेत. या ठिकाणी रेशनिंग दुकान चालवत असलेल्या दुकानदाराकडून आलेल्या …

Read More »