Breaking News

Monthly Archives: February 2023

हातनोली येथे जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

मोहोपाडा : प्रतिनिधी जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचा व हातनोली गावातून अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा भुमिपुजनाचा कार्यक्रम सरपंच रितू ठोंबरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. हातनोली गावची लोकसंख्या जवळपास 2600 ते 2700 च्या आसपास आहे. …

Read More »

वीहूर पुलाच्या रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

मुरुड  : प्रतिनिधी मुंबई मुरुड या मुख्य रस्त्याला जोडणारा वीहूर पूल अत्यंत महत्वाचा असताना सुधा केवळ दोनशे  मीटर रस्त्याला कार्पेट टाकण्याचा विसर बांधकाम खात्यास पडल्याने आज असंख्य प्रवासी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. सन 2021 च्या मुसळधार पावसामुळे विहूर् पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून जाऊन …

Read More »

माणकीवलीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कारवाई करण्याची मागणी : खडी तयार करण्यासाठी लावताहेत सुरुंग खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत माणकीवली हद्दीमध्ये खडी मशीन मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन करत असून या परिसरात सुरू असलेल्या खडी मशीनच्या धुळीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर या पाच दगड खान, खडीमशीन असल्याने या ठिकाणी …

Read More »

ठाकरे-वायकर कुटूंबीयांच्या 19 बंगल्यांची नोंद रद्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वायकर कुटुंंबीयांच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणात सहा जणांविरोधात रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. कोर्लई येथील जागेतील 19 …

Read More »

मोहा कोळीवाडा चषक क्रिकेट स्पर्धेचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त साईनाथ क्रिकेट क्लब आणि यंग स्टार यांच्या वतीने मोहा कोळीवाडा चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, माजी सरपंच नर्मदा विठ्ठलशेठ ओवळेकर, तरघर …

Read More »

रायगड प्रीमिअर लीगसाठी अलिबाग येथे होणार खेळाडूंचा ऑक्शन

अलिबाग : प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणार्‍या खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) प्रक्रिया रविवारी (दि. 26) अलिबाग येथे होणार आहे. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून जिल्ह्यातील सुमारे तीनशे खेळाडूंनी स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपापला सहभाग नोंदवला आहे. रायगडातील 25 वर्षांखालील खेळांडूसाठी रायगड प्रीमियर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन …

Read More »

आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत दिनेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश; पेण शहरप्रमुखपदी केली नेमणूक

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यात शिंदे गटातील प्रमुखांच्या पदांची नियुक्ती करण्यात आली होती, तर तालुक्यात पक्ष वाढवून तरुणांची फळी उभी करण्यासाठी जिल्ह्यातील तीनही आमदार प्रयत्नशील असून शिवसेनेत इनकमिंग सुरु झाल्याचे पक्ष प्रवेशावरून दिसून येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अलिबागचे आमदार महेंद्र …

Read More »

शेतकर्‍यांच्या सहनशिलतेचा ‘बांध’ फुटतोय…

अलिबाग तालुक्यातील खारेपाटाला उधाणाची समस्या गेले काही वर्षे भेडसावत आहे, परंतु त्याकडे कुणी लक्ष देत नाही. दर महिन्याला या भागात उधाणाचे पाणी धुसते. शेतजमीन नापिक बनत चालली आहे. आता हे पाणी घरांमध्येदेखील शिरू लगले आहे. दोनच दिवसांपूर्वी शहापूर उधाणाचे पाणी घरांमध्ये शिरले. 23 घरांचे नुकसान तर झाले, पण 300 एकर …

Read More »

विद्यार्थ्यांचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या परीक्षांचा नवा पॅटर्न लागू करण्याचा हट्ट अखेर आयोगाने सोडून दिला आहे. राज्य सेवा परीक्षा यंदापासून नव्या पॅटर्ननुसार घेण्यात येणार होत्या. विद्यार्थ्यांचा त्याला कडाडून विरोध होता. परिणामी, या परीक्षा अखेर दोन वर्षे उशीराने नव्या पॅटर्ननुसार घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्य …

Read More »

आपटा येथे गावठी बॉम्ब आढळले ; परिसरात खळबळ

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आपटा गावाच्या हद्दीत डोंगराळ व जंगल भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन गावठी बॉम्ब आढळले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी शिकारीसाठी आपटा हद्दीतील पाठारे फार्महाऊसच्या पाठीमागील बाजूस एक किलोमीटर अंतरावर डोंगराळ व जंगल भागात तीन गावठी बॉम्ब …

Read More »