आपल्याच राज्यात आपलीच राजभाषा सर्व शाळांमध्ये शिकवण्याची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागावा हीच मुळात लाजिरवाणी बाब आहे. हा कायदा करून आता वर्ष उलटून गेले, परंतु अजूनही काही खाजगी शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत असे दिसते. महाराष्ट्राच्या भूमीत मराठीला तुच्छ लेखण्याचा हा प्रकार निंदनीय आहेच. अशा बेमुर्वत शाळांना वठणीवर आणण्यासाठी एक …
Read More »शिक्षणाचा खेळखंडोबा
सर्वच क्षेत्रातील व्यवहार पूर्ववत होत असताना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे गाडे अजूनही रूळावर आलेले नाही ही खरे तर महाराष्ट्रासाठी शरमेची बाब म्हणायला हवी. शिक्षणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी गरज आहे ती ठाम आणि सर्वसमावेशक धोरणाची आणि त्याहीपेक्षा अधिक निर्णयांची. शिक्षणाबाबत काही निर्णय घेण्यासाठी नेतृत्वच उपलब्ध नसल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला आहे. कोरोना …
Read More »मिनीट्रेनला खासगीकरणाचा धोका
मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड कडून नेरळ- माथेरान-नेरळ मिनीट्रेन या जागतिक वारसा मिळावा म्हणून 2012 पासून युनोस्कोचा वारसा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र मिनीट्रेनची ओळख असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन ची प्रवासी वाहतूक सुरूच नाही. दुसरीकडे जागतिक वारसा बनण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनची इंजिने आज प्रवासी वाहतुकीसाठी …
Read More »अशांत महाराष्ट्र
पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र सध्या अनेक कारणांनी धूमसतोय. आधीच राज्यात शेतकर्यांचे प्रश्न, एसटी कर्मचार्यांचा संप यावर मार्ग काढण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याने अस्वस्थता पसरलेली असताना आता हिंसाचाराचा वणवा पेटलाय. निमित्त झाले ते त्रिपुरातील कथित घटनेचे. यावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांत मोर्चे निघाले आणि जे व्हायला नको होते तेच झाले. देशाच्या …
Read More »आपण ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’च्या प्रभावाखाली तर नाही ना?
वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध असतोच, असे नाही किंवा तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. त्याला म्हणतात ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’. त्याच्या प्रभावाखाली आपण नाही ना, याचा विचार केलाच पाहिजे. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी …
Read More »पारदर्शी आर्थिक व्यवहार आवडे का सर्वांना?
तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक व्यवहारांमध्ये जी पारदर्शकता येते आहे, त्याचा अनेकांना त्रास होतो आहे, असे दिसते आहे. पण ते सर्व आता सोपे सुटसुटीत, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि देशासाठी चांगले आहे, हे समजून घेतले की पारदर्शी आर्थिक व्यवहार आपल्यालाही आवडू लागतील. कारण हा प्रवास आता अपरिहार्य असा आहे. आर्थिक व्यवहार पारदर्शी …
Read More »डिजिटल सातबारा आता घरोघरी!
भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उतार्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकर्यांना पिक कर्ज, विमा योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी …
Read More »शेवटाकडे वाटचाल?
डेल्टा प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रचंड वेगाने होणारा फैलाव, जगाच्या काही भागांमध्ये लोकांची लसीकरणाविषयीची उदासीनता आणि सध्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमार्फत मिळणारे अर्धवट कोरोना संरक्षण या सार्यांमुळे कोरोनाशून्य जग इतक्यात काही प्रत्यक्षात येणार नाही. तज्ज्ञांच्या मते, या महासाथीचा शेवट म्हणजे इतर अनेक साथरोगांप्रमाणेच आपण या साथरोगावरही प्रभावी नियंत्रण मिळवणे. म्हणजे कोरोना अस्तित्वात असेल, …
Read More »तरूणांनो निर्व्यसनी राहा!
हिंदुस्तानी तरुणांनो निर्व्यसनी रहा, राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन उत्तराखंडमधील 14,500 फुट उंचीच्या पानगरचुला शिखरावरून पनवेल येथील गिर्यारोहक प्रा. विक्रांत घरत यांनी केले आहे. प्रा. विक्रांत घरत यांनी – 3 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असणारे पानगरचुला हे शिखर नऊ ऐवजी चार दिवसात सर केले आहे. पिल्लेज व्यवस्थापन …
Read More »लाल परीची परवड
एसटी कर्मचार्यांसाठी आता ही आरपारची लढाई झाली आहे. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांची भाषा आणि सरकारी दृष्टिकोन यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. एसटी कर्मचार्यांचा बेमुदत संप साम-दाम-दंड-भेद नीती वापरून कुठल्याही परिस्थितीत मोडून काढायचाच असा राज्यसरकारचा निर्धार दिसतो. साखर पेरणीची भाषा त्यामुळेच खोटी ठरते. म्हणूनच भारतीय जनता पक्षासारखा भरवशाचा पक्ष आज एसटी कर्मचार्यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper